Posts

शिरपूरची तीस खेडी जलसंपन्न- सुरेश खानापूरकर (Shirpurchi Tees Khedi Jalsampanna-Suresh Khanapurkar)

Image
शिरपूरची तीस खेडी जलसंपन्न पावसाचे पाणी जिथल्या तिथेच अडवा-जिरवा, ते स्थानिकांना वापरू द्या! अशी साधी व सोपी संकल्पना घेऊन सुरेश खानापूरकर काम करत आहेत. त्यांचा प्रयोग चालू आहे तो  धुळे  जिल्हयातील शिरपूर तालुक्यात. त्यांनी अमरीश पटेल ह्यांच्या सुतगिरणीच्या आर्थिक साहाय्याने एकोणतीस खेडी जलसंपन्न केली आहेत. तेथे मे महिन्यात देखील शेतीला पाणी मिळते; नवी धान्य लागवडं केली जाते! इतरत्रही ठिकाणी असे प्रयोग होत आहेत, पण येथील प्रयोगांची व्याप्ती, त्यात ओतलेला जीव व त्याला असलेला शास्त्रीय आधार यामुळे शिरपूरसारख्या दुष्काळी तालुक्यातील गावेसुद्धा सुजलाम् बनली आहेत. असली, नागेश्वर यांसारखे नाले, जे भर पावसाळ्यातही पाऊस पडून गेल्यानंतर कोरडे व रोडावलेले दिसायचे ते नाले तुडुंब भरलेले असतात. त्यात साठलेल्या पाण्यामुळे आसपासची भूजल पातळी उंचावली आहे. परिणामी, विहिरी व बोअरवेल्सना कमी खोलीवर पाणी लगत आहे. पाणी जमिनीत मुरवण्याकडे आतापर्यंत लक्ष दिले जात नव्हतं. उलटं, वाटेल तसे पाणी उपसले जायचे, त्याचा परिणाम म्हणून पाण्याची पातळी खोल-खोलवर जात राहिली. काही भागांत तर ती...

गरज पाणी साठवण्याची - अ. पां. देशपांडे (कार्यवाह मराठी विज्ञान परिषद ) [Garaj Pani Sathvanyachi- A.P. Deshpande )

Image
गेली 20 वर्षे तरी आपल्याला फेब्रुवारीपासून जूनमध्ये पावसाळा सुरू होईपर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवते आहे. याला लोकसंख्येतील वाढ, प्रत्येक माणसाची पूर्वीच्या तुलनेत वाढलेली पाण्याची गरज, वाढते औद्योगीकरण आणि बदलते हवामान ही प्रमुख कारणे आहेत. 1947 मध्ये देशाची लोकसंख्या 40 कोटींच्या घरात होती, ती आता 2015 मध्ये 125 कोटी झाली आहे. ही वाढ तिपटीने झाल्याने आपली पाण्याची गरज तितकी वाढली. पूर्वी माणूस विहिरीचे किंवा नदीचे पाणी आणून वापरत असल्याने त्याचा वापर काटकसरीने होई. आता नळाची चावी फिरवली की पाणी येत असल्याने पाण्याचा वापर (की गैरवापर) खूप वाढला आहे. शिवाय वॉशिंग मशिनसारखी उपकरणे जास्त पाणी वापरतात. 1947 मध्ये संपूर्ण राज्यात मिळून 5-10 कारखाने होते. आता प्रत्येक शहरात आणि गावात मोजता न येण्याएवढे कारखाने झाले आहेत आणि शेवटी बदलते हवामान आहेच, पण ते पूर्वीही होतेच की ! या सर्व कारणांमुळे पूर्वीचे पाणीसाठे अपुरे पडत आहेत. कारण त्यात आपण विशेष लक्षणीय अशी वाढ केलेली नाही.  यातील पहिले कारण वाढत्या लोकसंख्येचे आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कुटुंब निय...

बाजार-दासू वैद्य

चारेक वर्षांपूर्वी नव्यानं उघडणाऱ्या मॉलची सर्वत्र चर्चा होती. गावभर लागलेले होर्डिग्ज.. वर्तमानपत्रांतून मॉलच्या भव्यपणाचं कौतुक करताना ओसंडून वाहणारे रकाने.. प्रत्येकाच्या तोंडी मॉलची चर्चा रंगलेली. 'अहो, एवढा मोठ्ठा मॉल. संपूर्ण एअर कंडिशन आहे म्हणे!' 'हे आहे का? ते आहे का? असलं विचारायचं नाही. काय पाहिजे ते ब्रँडेड मिळणार!'.. असा मॉलचा बोलबाला वाढतच गेला. शेवटी हे मॉलचं वातावरण एवढं तापलं, की शुभारंभाच्या दिवशी प्रवेशासाठी लोकांना रांगा लावाव्या लागल्या. तरीही लोक आटोक्यात येईनात. शेवटी पोलिसांना पाचारण करावं लागलं. काहींनी पोलिसांचे दंडुके खाल्ले. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत मॉलसमोर लागलेल्या लांबच्या लांब रांगांचे फोटो झळकले. त्यामुळे उर्वरित लोकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली. परिणामी मॉलची गर्दी काही हटेना. एकमेकांना विचारणं सुरू झालं, 'तुम्ही अजून मॉलमध्ये गेला नाहीत?' या प्रश्नातील 'अजून'वर दिलेला जोर बघून अधिकच मागासल्यासारखं वाटायला लागलं. एखादा उत्साही रसिकमित्र मारधाड सिनेमा पाहून आल्यावर साभिनय स्टोरी सांगतो. त्यात त्यानं जवळपास चित्रपटाच...

इंटरनेटचा महामार्ग आणि ‘ट्रॅफिकजॅम’? - डॉ. अनिल लचके

इंटरनेट म्हणजे अब्जावधी संगणकांना जोडलेलं एक जटिल जाळं आहे. जगातील दोनशे देशांमधील सुमारे तीनशे कोटी ‘नेटिझन्स’ इंटरनेटमार्फत परस्परांशी प्रत्यक्ष वार्तालाप-आणि विविध आर्थिक-सामाजिक व्यवहार अहोरात्र साधत असतात. वर्ल्ड वाईड वेबमध्ये विविध माहिती, ब्लॉग, ट्विटर, यूट्यूब, वर्तमानपत्रे, ई-मेल, हाय-डेफिनिशन चित्रपट वगैरे समाविष्ट आहेत. कोणत्याही वेळी स्काइपवर सरासरी एक कोटी लोक तासन्‌तास एकमेकांसमोर बसून गप्पा रंगवत असतात. वर्ल्ड वाईड वेब हा तर इंटरनेटचा एक भाग आहे. यामध्ये मजकूर-चित्र(फीत)-ध्वनी असं सर्व तातडीने उपलब्ध होत असल्यामुळे इंटरनेट लोकप्रिय झालंय. इ. स. २०००पासून माहितीचा हा खजिना प्रतिवर्षी ६० टक्‍क्‍यांनी वाढतोय. पुढील दहा वर्षांत त्याचा वापर पन्नास पट वाढणार आहे. त्यामुळे हवी ती माहिती घरोघरी पोचवणाऱ्या इंटरनेटच्या महामार्गात आता अनेक अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. संभाव्य ‘ट्रॅफिकजॅम’ टाळण्यासाठी आता संशोधक प्रयत्नशील आहेत. भावीकाळात टीव्ही प्रक्षेपण आणि इंटरनेटचा वापर करताना त्रिमितीयुक्त होलोग्राफिक जिवंत प्रतिमा दिसतील. या अप्रतिम चित्रांसाठी माहितीचा गंगौघ तीस गिगाबिटस्‌...

मान्सून म्हणजे काय रे भाऊ ?

Image
नेमेचि येतो पावसाळा हे आपणास ठाऊकच आहे म्हणूनच त्याला मोसमी पाऊस /पावसाळा  असेही म्हणतात. पण तो नक्की कधी येणार, कसा , किती प्रमाणात येणार या आणि तत्सम भाकितांवर भारतासारख्या विशाल , खंडप्राय  देश्याच्या आर्थिक , सामाजिक , राजकीय आणि एकूणच जागतिक लोकसंख्येत अंदाजे १८-२०% इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या जनतेच्या किमान वर्षभराच्या जीवनमानाची गणिते -ठोकताळे अवलंबून असतात . नाही म्हणायला आताश्या बाळसे धरू लागलेला नव-श्रीमंत विविध उद्योजक, नोकरदार , व्यावसायिक आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात असलेले राजकीय उद्योजक अश्या सर्वांचा अपवाद तेवढा गृहीत धरावा लागेल कारण पाऊस वगैरे सारख्या घटकांचा त्यांच्या अर्थार्जानावर फारसा काही विपरीत परिणाम संभवत नाही (झाला तर फायदाच होतो कारण दुष्काळ म्हणजे वेगवेगळ्या योजनांची खैरातच की हो म्हणूनच दुष्काळ आवडे सर्वांना असे ख्यात आहेच या वर्गाबद्दल). असो तर असा हा मोसमी पाऊस  "मान्सून" नामक विशिष्ट पद्धतीने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या  प्रवाहावर अवलंबून असतो हे आपणास ढोबळमानाने ठाऊक आहे. पण  मान्सू...

प्रवास छत्रीचा ! - प्रा. शैलजा सांगळे

Image
पावसाळा तसा यंदा वर्षभरच होता ; नाही म्हणायला इतर ऋतू ही होते अधून-मधून आलटून पालटून. पण आता खराखुरा म्हणजे भरतखंडामधील मान्सून रुपी अधिकृत पावसाळा  आता अगदी तोंडावर येउन ठेपलाय. पावसाळा आला की आठवते छत्री. कारण छत्रीच आपले पावसापासून रक्षण करते. दर वर्षी येणाऱ्या वळवाच्या पावसाने किंवा मॉन्सूनच्या पहिल्या वर्षावाने चाकरमान्यांची कशी त्रेधातिरपीट उडते, ते आपण बघतोच. हवामान खात्याने पावसाच्या आगमनाची सूचना दिली की आपण गेल्या वर्षी कपाटात ठेवलेली छत्री शोधतो. कारण तिच्याशिवाय आपले घराबाहेर पडणे अवघड असते. थोडक्‍यात काय, तर छत्री व पावसाळा यांचा घनिष्ठ संबंध आहे. पावसाळा आला की दुकानाबाहेर लटकवलेल्या रंगीबेरंगी छत्र्या आपले लक्ष वेधून घेतात. पण प्राचीन काळी मात्र छत्रीचा वापर पावसापेक्षा उन्हापासून संरक्षण करण्यासाठी होई. अतिप्राचीन काळी तर मानसन्मान, सामर्थ्य, प्रतिष्ठा यांचे प्रतीक म्हणून छत्रीचा वापर होई.  भारतीय पुराणात छत्रीबाबत एक दंतकथा आहे. जमदग्नी हा बाण मारण्यात तरबेज होता. दिवसभर नेमबाजी करणे हा त्याचा सततचा उद्योग. त्यात त्याला त्याची पत्नी रेणुका हिची मोलाची साथ मि...

शेतीचा उद्योग-दीपक घैसास *

आज ८० टक्के शेती हा व्यवसाय आतबट्टय़ाचा ठरत असेल तर  बळीराजाचे राज्य आले पाहिजे वगैरे वाक्ये फेकणे आपण बंद केले पाहिजे. अशा वेळी या आतबट्टय़ातील छोटय़ा शेतजमिनी विकून निदान त्यांना दुसरा वैकल्पिक व्यवसाय करण्यास किंवा त्या जमिनींवर उभ्या राहणाऱ्या इतर उद्योगांत भागीदार होण्यास आपण मदत करणे गरजेचे आहे.. भूसंपादन कायद्याविषयी सध्या सर्वत्र वाद सुरू आहे. या देशात जणू शेती किंवा उद्योग यापैकी एकच टिकू शकेल की काय अशा आविर्भावात चित्रवाहिन्यांपासून वर्तमानपत्रांपर्यंत सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहेत. भारतच नव्हे तर जगातील सर्वच देश हे मुळात शेतीप्रधान देश होते. परंतु गेल्या हजारो वर्षांच्या शेतीच्या उद्योगानंतर माणसाच्या गरजा जशा वाढत गेल्या किंवा त्याने स्वत:ने जशा वाढवून घेतल्या तसा शेतीचा व्यवसाय अपुरा पडू लागला आणि शतकभरापूर्वी औद्योगिक क्रांतीचे वारे वाहू लागले. प्रामुख्याने पाश्चात्त्य देशांत, वैज्ञानिक शोधांच्या मदतीने विजेपासून सिमेंटपर्यंत, रेल्वेपासून मोटारींपर्यंत आणि तलवारीपासून तोफा व अग्निबाणांपर्यंत गोष्टींच्या उत्पादनाचे उद्योग सुरू झाले. या उद्योगांमुळे जशा माणसाच्या गर...