Posts

नेमेचि येतो पावसाळा

पावसाळा म्हटलं तर काहींचा अत्यंत आवडता  तर काहींचा नावडता ऋतू! मान्सून(नैरुत्य मारुत )थोड्या फार फरकाने कधी लवकर तर कधी उशिराने का होईना  एकदम इमान-एतबारे समस्त भारतभूमीतच नाही तर भारतीय उपखंडात बरसतच असतो.  साधारण एप्रिल -मे महिन्यात महाराष्ट्रातील (भारतातील पण म्हटले तरी चालेल)महानगर/नगर पालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे  अधिकारी आणि सजग नागरिक /विरोधी पक्ष यांचे नाले,मलनिस्सारण यंत्रणा साफ-सफाई(?) ,रस्ते दुरुस्ती(??)वरुन दावे-प्रतिदावे ,आरोप -प्रत्यारोप सुरु होतात. हे सर्व इतके सरावाचे झालेले आहे कि वर्तमानपत्र छापणाऱ्या किंवा बातम्या देणाऱ्या वाहिनीवरील मंडळीनी  बहुधा फक्त तत्कालीन कर्मचाऱ्यांचे नाव आणि तारीख बदलून कुठल्याही वर्षीच्या मजकूरात टाकली कि एकदम ताजी बातमी(ब्रेकिंग न्यूज ) तयार!! म्हणजे आता फक्त पाऊसाने बोहनी करण्याचीच बाकी राहिलेली असते. मग कधी तरी मुख्य परीक्षेआधी सराव चाचणी घ्यावी असा एखादा अवकाळी पाऊस कोसळतो (जो अलीकडील ४-५ वर्षात अगदी नियमितपणे येतोच ) आणि  बहुतेक सर्वांचे पितळ उघडे पाळतो म्हणा किंवा काही मंडळीना रोजी-रोटीची तरतूद ...

बैलांची माती.. मातीचे बैल..आसाराम लोमटे

Image
ज्याच्या मानेवर वर्षभर शेतीधंद्यातल्या राबणुकीचा भार असतो त्यालाही एक दिवस विश्रांती मिळते. मानेवर जो निबर असा घट्टा पडलेला असतो तो हळद आणि तूप लावून चोळला जातो, खांदेमळण म्हणतात ती हीच. हे खांदे मळल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वच्छ आंघोळी घातल्या जातात. नदीच्या, ओढय़ाच्या खळाळत्या पाण्यात धुतले जाते. िशगे रंगविली जातात, बािशगे बांधली जातात, चमकदार ऐने लावलेल्या झुली चढविल्या जातात आणि वाजतगाजत मिरवणूकही काढली जाते. एकदा हा दिवस संपला की पुन्हा मानेवर जू आणि अधूनमधून चाबकाचे फटके. हे फक्त बलांच्याच बाबतीत घडते असे नाही, हा संबंध थेट निवडणुकांच्या राजकारणाशीही जोडला जाऊ शकतो. मतदानाच्या आदल्या दिवशी काय पाहिजे ते मागा, मतदान केंद्रापर्यंत नेण्या-आणण्याचीही व्यवस्था होईल. तुमच्या खाण्यापिण्याचीही काळजी घेतली जाईल, पण एकदा निवडणूक झाली की पुन्हा पुढची पाच वष्रे कुणी ढुंकूनही पाहणार नाही. पोळा प्रत्येकाच्याच नशिबी असतो फक्त त्याचे स्वरूप वेगळे. बैल-पोळ्याच्या दिवशी मात्र बैलांबद्दल खरोखरच आदरभाव व्यक्त होतो. बैलाचे लग्नही लावले जाते आणि त्याला पुरणपोळीही खाऊ घातली जाते. इतकी काळजी...

ब्राझील वि. जर्मनी -फुटबॉल विश्वचषक -०८ जुलै २०१४-एक सात नमस्ते

Image
                                           उपांत्य सामना -बेलो होरीझान्ते -०८ जुलै २०१४ ब्राझील आपली ऐतिहासिक आणि नजाकतदार फुटबॉलची कला विसरली का?  खेळात  जय-पराजय सुरूच असतो पण कालचा ब्राझिलचा पराभव म्हणजे फारच मानहानिकारक ,प्रतिकार विरहीत आणि सच्च्या फुटबॉलप्रेमीच्या मनाला वेदना देणारा होता असेच म्हटले पहिजे.  कालच्या सामन्यात ब्राझील ऐवजी दुसरी कुठलाही संघ असता तर फार बरे झाले असते असे प्रकर्षाने वाटून गेले. असो आता बघूया काय होतेय ते आजच्या उपांत्य सामन्यात आणि रविवारच्या अंतिम सामन्यात !

‘‘ये दिल मांगे मोअर’’-शहीद कॅप्टन विक्रम बात्रा : लेखक ब्रिगेडियर - हेमंत महाजन

Image
शहीद कॅप्टन विक्रम बात्रा.. कारगिल युद्धाचा अभिमानास्पद चेहरा.. त्याच्या कर्तृत्वाच्या कथा आजही सांगितल्या जातात. त्याच्या आई-वडलांच्या डोळ्यातले अश्रू कधीच पुसले जाणार नाहीत. त्याच्या प्रेयसीनेही त्याच्या आठवणींच्या बळावर जगण्याचा निर्णय घेतलाय. त्याचे नातेवाईक, लष्कर त्याला कधीच विसरणार नाहीत. मात्र त्याही पलीकडे सामान्यांच्या मनातही त्याचं एक अढळ स्थान निर्माण झालंय.   लेफ्टनंट विक्रम बात्राला काहीही करून ते मिशन यशस्वीरीत्या पूर्ण करायचेच होते. जम्मू-काश्मीरमध्ये १७ हजार फुटांवर ५१४० शिखरावर पाकिस्तानी घुसखोरांनी कब्जा केला होता. हिमाचलच्या लेफ्टनंट विक्रम बात्रा आणि कॅप्टन संजीव जामवाल या दोन्ही सुपुत्रांना हे शिखर १९ जूनच्या रात्री काबीज करण्याचे आदेश देण्यात आले होते. दिवसा ही कामगिरी पार पाडणं कठीण होतं. लेफ्टनंट विक्रम बात्रावर ही कामगिरी सोपवल्यानंतर युद्धभूमीवरच त्याला कॅप्टन अशी पदोन्नती देण्यात आली. कॅप्टन विक्रम बात्राने शिखर ५१४०वर मागच्या बाजूने चढाई करून ते ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. तोलोलिंग पर्वतरांगांमध्ये शिखर ५१४० सर्वाधिक उंचीवरचं शिखर आह...

फर्मानबाडीचे महत्त्व-सदानंद मोरे

Image
पानिपतचा पराभव मराठय़ांच्या इतिहासातील सर्वात क्लेशकारक घटना मानायचे असेल, तर सर्वात सुखद  घटना म्हणून पेशव्यांना वस्त्रे देण्याचा, म्हणजे 'फर्मानबाडी'च्या कार्यक्रमाचा उल्लेख करता येईल. बादशाहची मुखत्यारी मिळाल्यामुळे मराठे दिल्लीच्या मोगल सत्तेचे अधिकृत प्रतिनिधी बनले. इंग्रजांनाही अडवण्याचा व चाप लावण्याच्या अधिकार त्यांना प्राप्त झाला. या प्रक्रियेत अनेकांचा सहभाग असला तरी शेवटास नेली ती महादजी शिंदे यांनी.. पानिपतच्या युद्धात मराठय़ांचे जे नुकसान झाले, त्याचा विचार करता एखाद्यास तो मराठय़ांच्या इतिहासाचा 'अँटिक्लायमॅक्स' वाटणे शक्य आहे. पण मग 'क्लायमॅक्स' कोणत्या घटनेला मानायचा, असा प्रश्न उपस्थित होईल. येथे कोणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची आठवण होईल. शेकडो वर्षांच्या पराभवाच्या व पारतंत्र्याच्या परंपरेला छेद देणारी व खुद्द औरंगजेबाला 'हाय तोबा' करायला लावणारी ही घटना मराठय़ांच्या इतिहासास कलाटणी देणारीही होती. तथापि, त्या वेळी मराठय़ांच्या पराक्रमाची व सत्तेची तयारी महाराष्ट्रापुरती मर्यादित होती. पानिपतची लढाई दूर महाराष्ट...

पानिपतची लाभहानी-सदानंद मोरे

Image
पानिपतच्या पराभवाचा मोठा बाऊ करणे चुकीचे आहे.  ज्यांच्या हातून पराभव झाला तो सेनानी कुशल आणि सैन्य पराक्रमी होते. हे विसरता कामा नये, की ब्रिटिशांनी हिंदुस्थान जिंकून घेतल्यानंतर अफगाणांशी केलेल्या तीन युद्धांमध्ये त्यांना निर्णायक विजय मिळवता आला नाही. अलीकडच्या काळात रशियन सैन्यालाही अखेर अफगाणिस्तानातून माघार घ्यावी लागली आणि त्यानंतर अजूनही अमेरिकेने अफगाणांचा पूर्ण बंदोबस्त केला आहे असा दावा व्हाइट हाऊस करू शकत नाही.. खैबरखिंडीतून भारतावर आक्रमण करून आलेल्या आक्रमकाशी संघर्ष करून, त्याला या संघर्षांत हरवून, त्याचा पाठलाग करीत त्याच्या मायदेशी पिटाळून लावले आहे, असे मराठय़ांनी अब्दालीच्या फौजांना अटकेपार हाकलून देईपर्यंत कधी घडले नव्हते. मराठय़ांच्या काही तुकडय़ा सिंधुपार होऊन पेशावपर्यंत पोहोचल्याचा पुरावा कागदोपत्री आढळतो. पण मराठय़ांचे मनसुबे एवढय़ापुरतेच मर्यादित नव्हते. त्यांच्या डोळ्यांसमोरील हिंदुस्थानात काबूल, कंदाहारचे सुभे होते आणि त्याचा स्पषट उल्लेख त्यांनी केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अखंड हिंदुस्थानची व्याप्ती सिंधू नदीपर्यंत होती आणि मराठे काबूल, कंदाहा...

एक शहेनशाह कि लंबी कहानी -डॉ. यशवंत रायकर

Image
शहाजानचं आयुष्य म्हणजे एक दीर्घकथा आहे. ज्यात अनेक पापुद्रे आहेत. पति-पत्नीच्या अमेर प्रेम कहाणीचे, पिता-पुत्र संघर्षांचे आणि भाऊबंदकीचे अनेक पदर आहेत.शाहजहान बादशहाचे जीवन एक दीर्घकथा आहे, सत्यकथा आहे. एका महानायकाची ती शोकान्तिका आहे. सुबत्ता आणि सुवर्ण काळातून दुर्दशा आणि दुष्काळात घेऊन जाणाऱ्या घटनांची हकीकत आहे. त्याचबरोबर कथेत कथा गुंफल्या जाव्यात, तशा घडामोडींचे कथा सरित्सागर नव्हे, पण सरोवर आहे. म्हणून हे कथानक वीर, रौद्र, भयानक, बीभत्स, शृंगार, हास्य व करुण अशा रसांची अनुभूती देत पुढे सरकते. शाहजहानचा काळ मोगल साम्राज्याचा सुवर्णकाळ होता. ताजमहल (१६३१-१६४८) हे त्याच्या उच्चांकाचे प्रतीक. सुबत्तेशिवाय अशी किमया साकारणे शक्य नव्हते. या बादशहाची कारकीर्द १६२८ ते १६५८. म्हणजे त्याने तीस वर्षे राज्य केले. पण तो जगला ७४ वर्षे (१५९२- १६६६).  म्हणून शाहजहानची म्हणजे खुर्रमची कथा सुरू होते अकबराच्या काळात आणि संपते औरंगजेबाच्या कैदेत. त्यामुळे चार बडय़ा मोगल सम्राटांबद्दल ती बरेच काही सांगून जाते. दिग्विजयाच्या घोडदौडीची परिणती विपन्नावस्था व विनाश यात कशी होत गेली...