Posts

अवकाळी गारपिटीचे चक्रव्यूह भेदताना...

हल्ली ऋतुचक्र पार आकलनापलीकडे गेलेय अगदी व्हाट्स-अपवर अलीकडेच फिरत असलेल्या एका विनोदाप्रमाणे  पावसाळा  हिवाळा आणि    उन्हाळा, या तीन मुख्य ऋतूंपेक्षा आता  हिवसाळा, पावन्हाळा आणि ऊन्हसाळा हेच मुख्य ऋतू म्हणावे असेच काहीसे झाले की काय याची भीतीदायक शंका वाटत राहावी अशी परिस्थिती झालीय. मागच्या काही वर्षात येत असलेल्या अवकाळी पाऊस,गारपीट या नैसर्गिक आपत्ती जणू काही आता नियमितपणे किंवा कायम स्वरूपी येत आहेत की  काय ? हा एक मोठा प्रश्न आज भारत खंडच नाही तर समस्त जगासमोर उभा ठाकला आहे. आत्ता जो प्रश्नच नीट कळला नाही त्याचे उत्तर तरी काय आणि कसे देणार ??  साधारणत: एक वर्षापूर्वी "साप्ताहिक सकाळ" मध्ये  किरणकुमार जोहरे यांचा   " अवकाळी गारपिटीचे चक्रव्यूह भेदताना..." शीर्षकाचा एक लेख प्रकाशित झाला होता (तो खालीलप्रमाणे) जो आजही अगदी तंतोतंत लागू पडावा हा दुर्दैवी योगायोग आणि आपण आणि आपले सरकार निगरगट्टपणे अगदी काही झालेच नाही या अविर्भावात; वर्तमानपत्राच्या मागच्या पानावरून पुढे जावे इतक्या सहजतेने मागच्या वर...

वाक्युद्ध जिंकण्याच्या लोकप्रिय पद्धती-सलील अनप्लग्ड

'हो, मला तुझं म्हणणं पटलं..' हे वाक्य ऐकणं म्हणजे 'तू महान आहेस,' 'माझे तुझ्यावर प्रेम आहे', 'तू सर्वोत्तम आहेस' या सगळ्यापेक्षा 'मोठी' वाटणारी मिळकत!! मेंदूमध्ये विविध प्रकारची जुळवाजुळव करून दुसऱ्याला आपलं 'म्हणणं' पटवून देणं, यात मनुष्यप्राणी सगळ्यात जास्त रमतो. सर्वाधिक मानसिक  शक्तीचा खर्च होणारी जागा.. 'दुसऱ्याला समजावून सांगणं'! सतत दुसऱ्याला समजून घेणं आणि आपलं म्हणणं दुसऱ्याच्या मनी आणि गळी उतरवणं यामध्ये नव्वद टक्के लोकांची शंभर टक्के शक्ती संपून जाते. मग कुठून येणार सर्जनशीलता..? वगैरे! या शब्दांच्या चढाओढीत अनेक खेळी खेळल्या जातात. प्रत्येकजण आपापली उपलब्ध शस्त्रसामग्री घेऊन या वाक्युद्धात उतरतो ते विजय मिळवण्यासाठीच!  बावीस वर्षांच्या एका मुलीने स्वत: लग्नाचा घेतलेला निर्णय अमान्य असणाऱ्या वडिलांचे मुलीशी वाक् युद्ध.. आणि सर्वमान्य लोकप्रिय पद्धती : १) शक्तिमार्ग- 'सांगा तिला- म्हणावं, असलं चालणार नाही.. आमची पत आहे म्हणावं.' माननीय श्री. दादा, भाऊ, अण्णा हे मुलीशी थेट बोलतसुद्धा नाहीत. असल्या महत्त्वाच्या वे...

#मराठी राजभाषा दिन

मराठी राजभाषा दिनानिमित्त तमाम मराठीजनांना मनापासून शुभेच्छा. ज्यांचा जन्मदिन आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो, त्या कुसुमाग्रजांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! खरे तर आपल्या मातृभाषेसाठी असा एक दिवस "राजभाषा/गौरव दिन " या गोंडस नावाखाली साजरा करण्यात आपण  धन्यता मानण्यापेक्षा दैनंदिन जीवनात आपण फक्त जाणीवपूर्वक काही छोट्या छोट्या गोष्टी केल्यास विनासायास आजीवन "मराठी गौरव दिन " साजरा होतच राहील याची खात्री मनात बाळगा काही छोट्या-छोट्या गोष्टी आपण केल्या, तरी भाषेच्या विकासाला त्या पूरक ठरतील.दररोज आपण भरपूर इंग्लिश/हिंदी शब्द आपल्या व्यवहारात  कळत नकळत वापरत असतो त्यांचे पर्यायी शब्द माहिती करून घेण्याचा  प्रयत्न करूयात .  आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे समाज माध्यमांत (सोशल मीडिया) अगदी सहजपणे मराठी वापरू शकतो जसे की युनिकोड-मराठी. त्याचा वापर वाढवा, युनिकोड मराठी पद्धतीचा प्रसार करा,  महत्वाचे म्हणजे वेळोवेळी आपला परभाषिक व्यक्तींशी जसे कि प्रवासातील संभाषणात (आपल्या शहरात जे महाराष्टा...

भ्या, पण घाबरू नका-डॉ. राजीव शारंगपाणी

...... आजचा काळ   हा घबराट उत्पन्न करून आपल्या पोळीवर तूप ओढणाऱ्यांचा आहे. पुढे काही तरी भयंकर होऊ शकेल म्हणून आताच पैसे खर्च करा, असे सांगून तुमचे मदाऱ्याचे माकड करणाऱ्यांचा काळ आहे. आपण जर घाबरलो तर आपल्या अंगावरचे कपडेदेखील ओढून न्यायला कमी करणार नाहीत. 'भित्यापाठी ब्रह्मराक्षस' ही म्हण 'घाबरलेल्यापाठी ब्रह्मराक्षस' अशी थोडी बदलायची एवढेच. आयुष्य जगताना माणसापाठी अनेक प्रकारचे भय असते. साधा रस्ता ओलांडतानादेखील वाहने ज्या पद्धतीने अंगावर येतात, त्याचे भय असतेच प्रत्येकाला. पण आपण न घाबरता रस्ता ओलांडतो. सामान्यपणे काही होत नाही. भीतीला सामोरे जाऊन आपल्याला पाहिजे ते नीट करणे हे अतिशय महत्त्वाचे ठरते. मूर्तिमंत भीती समोर उभी असताना धैर्याने प्रसंगातून सहीसलामत बाहेर पडणे हे नंतर खूपच मनोरंजक वाटते. सामान्य आयुष्यात भीती दाखवून काळजी घेण्याचा आव आणणारे अनेक असतात. कित्येक लोकांच्या घरातच अशा व्यक्ती असतात की, कोणतीही एक नवी कल्पना मांडली की त्याच्यामुळे संपूर्ण नुकसान कसे होणार आहे हेच ते सांगू लागतात. ब्रह्मज्ञानी माणूसदेखील इतके छातीठोक बोलत नाही. ज्या माणसाने ही क...

माधव जूलियन-"प्रेमस्वरूप आई "

मराठीतील प्रसिद्ध कवी डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांची २१ जानेवारी ही जयंती. अत्यंत नावाजलेले मराठी कवी  आणि फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक या भूमिका त्यांनी अत्यंत ताकदीने पेलल्या. मराठी साहित्याचे भावविश्व आपल्या तरल आणि  भाव मधुर कवितांनी समृध्द केले. त्यांचीच "प्रेमस्वरूप आई" या शीर्षकाची एक अत्यंत हृदयस्पर्शी कविता : प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई ! बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ? तू माय, लेकरु मी; तू गाय, वासरु मी; ताटातुटी जहाली, आता कसे करु मी ? गेली दुरी यशोदा टाकुनि येथ कान्हा, अन्‌ राहीला कधीचा तान्हा तिचा भुका ना? तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे - जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे ; नैश्ठूर्य त्या सतीचे तू दावीलेस माते , अक्षय्य हृत्प्रभूचे सामीश्य साधन्याते. नाही जगात झाली आबाळ या जिवाची, तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची. चिती तुझी स्मरे ना काहीच रूपरेखा, आई हवी महणूनी सोडी न जीव हेका. विद्याधनप्रतिष्ठा  लाभे अता मला ही, आईविणे परी मी हा पोरकाच राही. सारे मिळेपरं तू आई पुन्हा न भेटे , तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे . ...

संशोधन-अप्पा बळवंत

काळ : इ. स. पूर्व २७०० उष:काल होण्यास अद्याप तीन प्रहर अवकाश होता. संपूर्ण आश्रम निद्राधीन होता. रात्रकीटकही जणू श्रमून शांत झाले होते. गंगेपलीकडील अरण्यातून मधूनच येणारे श्वापदांचे उत्क्रोशवगळता सर्वत्र नीरव शांतता होती. श्रृतकेतू मात्र पूर्णत: जागा होता. सहस्ररश्मीच्या तीव्र तापाने स्थालिकेतील जलबिंदूंची वाफ व्हावी तसे त्याच्या नेत्रातील निद्रेचे झाले होते. अचानक देहावरील आस्तरण दूर सारून तो शय्यामंचावर उठून बसला. त्याच्या मन:च क्षूंसमोर काही तरी अस्पष्ट अस्पष्ट दिसू लागले होते. ते कुणाकडे तरी व्यक्त करावे असे त्यास प्रकर्षांने वाटत होते. पण सर्व सहाध्यायी निद्राधीन होते. कोणासमोर मनातील विचार व्यक्त करणार? अखेर त्याने बाजूच्या दीपिकेची ज्योत मोठी केली व त्या प्रकाशात भूर्जपत्रावर तो मनातील काव्य मांडू लागला.. ००० श्रृतकेतूच्या मनी गेल्या काही दिनांपासून एकच प्रश्नयज्ञ सुरू होता.. त्याच्या मनोभूमीत त्या प्रश्नाचे बीज पेरले होते, ते ऋषी स्तीवजाब यांनी. एके दिवशी सायंकालचे समयी स्तीवजाब व त्यांचे विद्यार्थीगण अरण्यातून परतत होते. अचानक त्यांना वाटेमध्ये एक ग्रामीण अस्ताव्यस्त पडलेला आ...

गाणं! -अप्पा बळवंत

एक नवं क्यालेंडर                                                                                     अन् त्याची बारा पानं                                                                               एवढं काय असतं त्यात                                                                             की त्याचं गावं गाणं? तेच दिवस त्याच रात्री                 ...