Posts

इंटरनेटचा महामार्ग आणि ‘ट्रॅफिकजॅम’? - डॉ. अनिल लचके

इंटरनेट म्हणजे अब्जावधी संगणकांना जोडलेलं एक जटिल जाळं आहे. जगातील दोनशे देशांमधील सुमारे तीनशे कोटी ‘नेटिझन्स’ इंटरनेटमार्फत परस्परांशी प्रत्यक्ष वार्तालाप-आणि विविध आर्थिक-सामाजिक व्यवहार अहोरात्र साधत असतात. वर्ल्ड वाईड वेबमध्ये विविध माहिती, ब्लॉग, ट्विटर, यूट्यूब, वर्तमानपत्रे, ई-मेल, हाय-डेफिनिशन चित्रपट वगैरे समाविष्ट आहेत. कोणत्याही वेळी स्काइपवर सरासरी एक कोटी लोक तासन्‌तास एकमेकांसमोर बसून गप्पा रंगवत असतात. वर्ल्ड वाईड वेब हा तर इंटरनेटचा एक भाग आहे. यामध्ये मजकूर-चित्र(फीत)-ध्वनी असं सर्व तातडीने उपलब्ध होत असल्यामुळे इंटरनेट लोकप्रिय झालंय. इ. स. २०००पासून माहितीचा हा खजिना प्रतिवर्षी ६० टक्‍क्‍यांनी वाढतोय. पुढील दहा वर्षांत त्याचा वापर पन्नास पट वाढणार आहे. त्यामुळे हवी ती माहिती घरोघरी पोचवणाऱ्या इंटरनेटच्या महामार्गात आता अनेक अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. संभाव्य ‘ट्रॅफिकजॅम’ टाळण्यासाठी आता संशोधक प्रयत्नशील आहेत. भावीकाळात टीव्ही प्रक्षेपण आणि इंटरनेटचा वापर करताना त्रिमितीयुक्त होलोग्राफिक जिवंत प्रतिमा दिसतील. या अप्रतिम चित्रांसाठी माहितीचा गंगौघ तीस गिगाबिटस्‌...

मान्सून म्हणजे काय रे भाऊ ?

Image
नेमेचि येतो पावसाळा हे आपणास ठाऊकच आहे म्हणूनच त्याला मोसमी पाऊस /पावसाळा  असेही म्हणतात. पण तो नक्की कधी येणार, कसा , किती प्रमाणात येणार या आणि तत्सम भाकितांवर भारतासारख्या विशाल , खंडप्राय  देश्याच्या आर्थिक , सामाजिक , राजकीय आणि एकूणच जागतिक लोकसंख्येत अंदाजे १८-२०% इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या जनतेच्या किमान वर्षभराच्या जीवनमानाची गणिते -ठोकताळे अवलंबून असतात . नाही म्हणायला आताश्या बाळसे धरू लागलेला नव-श्रीमंत विविध उद्योजक, नोकरदार , व्यावसायिक आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात असलेले राजकीय उद्योजक अश्या सर्वांचा अपवाद तेवढा गृहीत धरावा लागेल कारण पाऊस वगैरे सारख्या घटकांचा त्यांच्या अर्थार्जानावर फारसा काही विपरीत परिणाम संभवत नाही (झाला तर फायदाच होतो कारण दुष्काळ म्हणजे वेगवेगळ्या योजनांची खैरातच की हो म्हणूनच दुष्काळ आवडे सर्वांना असे ख्यात आहेच या वर्गाबद्दल). असो तर असा हा मोसमी पाऊस  "मान्सून" नामक विशिष्ट पद्धतीने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या  प्रवाहावर अवलंबून असतो हे आपणास ढोबळमानाने ठाऊक आहे. पण  मान्सू...

प्रवास छत्रीचा ! - प्रा. शैलजा सांगळे

Image
पावसाळा तसा यंदा वर्षभरच होता ; नाही म्हणायला इतर ऋतू ही होते अधून-मधून आलटून पालटून. पण आता खराखुरा म्हणजे भरतखंडामधील मान्सून रुपी अधिकृत पावसाळा  आता अगदी तोंडावर येउन ठेपलाय. पावसाळा आला की आठवते छत्री. कारण छत्रीच आपले पावसापासून रक्षण करते. दर वर्षी येणाऱ्या वळवाच्या पावसाने किंवा मॉन्सूनच्या पहिल्या वर्षावाने चाकरमान्यांची कशी त्रेधातिरपीट उडते, ते आपण बघतोच. हवामान खात्याने पावसाच्या आगमनाची सूचना दिली की आपण गेल्या वर्षी कपाटात ठेवलेली छत्री शोधतो. कारण तिच्याशिवाय आपले घराबाहेर पडणे अवघड असते. थोडक्‍यात काय, तर छत्री व पावसाळा यांचा घनिष्ठ संबंध आहे. पावसाळा आला की दुकानाबाहेर लटकवलेल्या रंगीबेरंगी छत्र्या आपले लक्ष वेधून घेतात. पण प्राचीन काळी मात्र छत्रीचा वापर पावसापेक्षा उन्हापासून संरक्षण करण्यासाठी होई. अतिप्राचीन काळी तर मानसन्मान, सामर्थ्य, प्रतिष्ठा यांचे प्रतीक म्हणून छत्रीचा वापर होई.  भारतीय पुराणात छत्रीबाबत एक दंतकथा आहे. जमदग्नी हा बाण मारण्यात तरबेज होता. दिवसभर नेमबाजी करणे हा त्याचा सततचा उद्योग. त्यात त्याला त्याची पत्नी रेणुका हिची मोलाची साथ मि...

शेतीचा उद्योग-दीपक घैसास *

आज ८० टक्के शेती हा व्यवसाय आतबट्टय़ाचा ठरत असेल तर  बळीराजाचे राज्य आले पाहिजे वगैरे वाक्ये फेकणे आपण बंद केले पाहिजे. अशा वेळी या आतबट्टय़ातील छोटय़ा शेतजमिनी विकून निदान त्यांना दुसरा वैकल्पिक व्यवसाय करण्यास किंवा त्या जमिनींवर उभ्या राहणाऱ्या इतर उद्योगांत भागीदार होण्यास आपण मदत करणे गरजेचे आहे.. भूसंपादन कायद्याविषयी सध्या सर्वत्र वाद सुरू आहे. या देशात जणू शेती किंवा उद्योग यापैकी एकच टिकू शकेल की काय अशा आविर्भावात चित्रवाहिन्यांपासून वर्तमानपत्रांपर्यंत सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहेत. भारतच नव्हे तर जगातील सर्वच देश हे मुळात शेतीप्रधान देश होते. परंतु गेल्या हजारो वर्षांच्या शेतीच्या उद्योगानंतर माणसाच्या गरजा जशा वाढत गेल्या किंवा त्याने स्वत:ने जशा वाढवून घेतल्या तसा शेतीचा व्यवसाय अपुरा पडू लागला आणि शतकभरापूर्वी औद्योगिक क्रांतीचे वारे वाहू लागले. प्रामुख्याने पाश्चात्त्य देशांत, वैज्ञानिक शोधांच्या मदतीने विजेपासून सिमेंटपर्यंत, रेल्वेपासून मोटारींपर्यंत आणि तलवारीपासून तोफा व अग्निबाणांपर्यंत गोष्टींच्या उत्पादनाचे उद्योग सुरू झाले. या उद्योगांमुळे जशा माणसाच्या गर...

... अन् भुर्र उडून जा!

आज मला विजय पाडळकर यांची एका पोक्त बापाची लघुकथा आठवते आहे. या बापाला एक दिवस, मुलगा सातव्या वर्गात असताना त्याच्यासाठी घेतलेली टेबल टेनिसची रॅकेट आणि चेंडू सापडतात. ते दिसल्यावर त्याला तो तेव्हा मुलाबरोबर खेळत असलेला, चेंडू खाली न पाडता त्याचे टप्पे बॅटवर मारत राहण्याचा खेळही आठवतो. (त्यावेळेस या खेळात तोच नेहमी जिंकत असे) आज हे आठवल्यावर तो बाप पुन्हा एकदा तसं खेळायचा प्रयत्न करतो. पण दहा-बारा टप्प्यांच्या वर त्याला ते जमत नाही. कथेच्या शेवटी पाडळकर लिहितात, ''आजकाल तो रोज प्रॅक्टिस करतो आहे. एका महिन्यात चाळीस टप्प्यांपर्यंत मजल गेली आहे त्याची. त्याला खात्री आहे, अटलांटातला मुलगा जेव्हा पुढच्या दिवाळीला भेटायला येईल तेव्हा आपण नक्कीच त्याला हरवू शकू.'' परदेशात स्थायिक झालेल्या तरुण मुलांच्या आईबापांच्या आयुष्यातल्या पोकळीचं हृदय हेलावणारं दर्शन या छोट्याशा कथेमधून आपल्याला होतं आणि आपण चुकचुकतो. असे आयुष्य जगणारी अनेक वयस्कर जोडपी आज आपल्याला अवतीभवती दिसतात. आर्थिक समृद्धी आहे. पण मायेचं जवळ कुणीच नाही. त्यामुळे भयाण एकाकीपणा आहे, असहायता आहे आणि शिवाय मुलं, सुना,...

चाळिशी मायक्रोसॉफ्टची !

Image
‘विंडो’ उघडल्याशिवाय कॉम्प्युटरच्या दुनियेची सकाळ होत नाही. एवढी सर्वव्यापी बनलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीला नुकतीच (४ एप्रिल) चार दशकं पूर्ण झाली. संपूर्ण जगाला नवी दिशा देणाऱ्या या कंपनीचा प्रवास थक्क करणारा आहे, तसंच खूप काही शिकवणाराही. संगणकांच्या सॉफ्टवेअर क्षेत्रात ही कंपनी अद्याप ‘दादा’ आहे; पण हीच स्थिती कायम राहणार का? मायक्रोसॉफ्टच्या कामगिरीचा मागोवा... ‘अवर इंडस्ट्री डज नॉट रिस्पेक्‍ट ट्रॅडिशन- इट ओन्ली रिस्पेक्‍ट्‌स इनोव्हेशन.’ मायक्रोसॉफ्टचा सीईओ म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सत्या नडेला यांच्या पहिल्या भाषणातलं हे विधान खूपच गाजलं. ‘परंपरा विसरा, नव्याचा शोध घ्या’ असा अर्थ कुणी काढला, तर काहींनी त्याकडं आणखी वेगळ्या नजरतून पाहिलं.  आपणास ‘एमएस डॉस’ माहिती आहे का? बरं, विंडोज वन माहितेय का? बरं जाऊ द्या, विंडोज ९५, ९८. पण विंडोज एक्‍सपी निश्‍चितच माहिती असणार, कारण ते अलीकडेच ‘आउटडेटेड’ झालं आहे. या प्रश्‍नांची उत्तरं शोधताना सत्या नडेला यांच्या विधानामध्ये किती तथ्य आहे, हेच अधोरेखित होईल. कारण दिवसभर संगणकविश्‍वात रमणाऱ्या आजच्या पिढीला ‘एमएस डॉस’ माहितीच नाही,...

'मनीऑर्डर' इतिहासाच्या पलीकडे..

Image
भारतीय पोस्ट सेवेचा इ.स.१६८८ मध्ये ब्रिटीशांनी मुंबई येथे एक कार्यालय    स्थापन  केल्यापासून आजपर्यंत एक स्वतंत्र असा शेकडो वर्षांचा इतिहास आहे. कालानुरूप पावले टाकत  ब्रिटीशांनी आपल्या साम्राज्य विस्तारासोबत पोस्ट आणि रेल्वे सेवांचे जाळे भारतभर विणले.बघता बघता या सेवा जीवनावश्यक म्हणाव्या इतक्या सर्व सामान्य नागरिकांच्या आयुष्यात रुळल्या पैकी अगदी गावोगाव खेडी-पाडी पोहोचलेली पोस्टसेवेइतकी खचितच कुठली इतर शासकीय-बिगर शासकीय यंत्रणा  नागरिकांच्या दैनंदिन  आयुष्यात  महत्वाची ठरली असेल. इतक्या प्रदीर्घ सेवेनंतर पुन्हा एकदा बदलत्या गतिमान तंत्रज्ञानासोबत जुळवून घेतांना जुन्या सेवांना कधी आपोआप बाद ठरल्यामुळे तर कधी अगदीच थंडावलेल्या प्रतिसादामुळे कायमच्या बंद करण्याची सुरुवात कधीच झाली. पोस्टकार्ड, तारसेवा आणि मनी ऑर्डर यासारख्या अनेक सेवांपैकी एक अत्यंत महत्वाची असलेली;  ग्रामीण भागातील चाकरमानी कुटुंबांच्या अर्थकारणाशी जोडलेली आणि निरोपाबरोबरच पैसे देण्यासाठी धावणारी 'मनीऑर्डर सेवा' नुकतीच १ एप्रिलपासून बंद करण्यात आली आहे....