Posts

कोण कोणाला मारित भोंगा? श्री.ज्ञानेश्वर मुळे

श्री . ज्ञानेश्वर मुळे(Consul General of India, New York, USA ) यांचा एक विचार करायला लावणारा लेख: _______________________________________________________________________________ कोण कोणाला मारित भोंगा? सातेक वर्षांच्या परदेशातील वास्तव्यानंतर परतल्यानंतर तीव्रतेने जाणवलेली एक गोष्ट कोणती, असे कुणी विचारले तर मी म्हणेन "आवाज.‘ चोहोबाजूंनी येणारा . प्रत्येक दिशेने येणाऱ्या या सगळ्या आवाजांचा एक सामूहिक जीवघेणा आवाज जणु पाठलाग करतोय. वाटते की आपल्यापुढे एकच पर्याय आहे. या सर्व आवाजांना चिरत जाणारा आपला एक आवाज उठवावा किंवा उंच आकाशात उडवावा आणि सांगावे, "बंद करो सब आवाजें हमेशा के लिए‘  दिल्लीतील आवाजांची विविधता आणि तीव्रता लक्षणीय आहे. इथली कबुतरे आणि कावळेसुद्धा जोरजोरात शक्तिप्रदर्शन करताना दिसतात. वाहनचालक सहज "हमरीतुमरी‘वर येतात, तेव्हा "हमरीतुमरी‘चा अर्थ कळतो. बुद्धिवंतांच्या आवाजाची वेगळीच गोष्ट. वृत्तपत्रांतील सर्व बातम्यांचा एकसंध गदारोळ उडून आपली भंबेरी उडतेय की काय, असा भास होतो. त्या सर्व लेखांना आणि बातम्यांना, मुद्रित-लिखित शब्दांऐवजी आवाज प्र...

नावात काय नाही?- निखिल रत्नपारखी

Image
शेक्सपीअर म्हणून गेला आहे की , ‘ नावात काय आहे ’? मला काही हे सहजासहजी मान्य होणारं नाही. मान्य होणार नाही म्हणजे आपण काही थोरामोठय़ांविषयी सवंग किंवा उगाच वादग्रस्त विधानं करून लोकप्रियता मिळवणाऱ्यांपैकी नाही. पण मी म्हणतो- नावात काय नाही ? हेच मत माझ्या एका क्रांतिकारी मित्राचं पण आहे. (स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पुणे शहरात ‘ क्रांतिकारी ’ या शब्दाचा अर्थ कुठलीही भीडभाड न बाळगता आपलं मत स्पष्टपणे मांडणारा- एवढाच मर्यादित आहे. याला विषय , वय , हुद्दा याचं बंधन नाही. फक्त आपलं मत चारचौघांच्या कानावर जाईल आणि एखादी छोटीशी का होईना , आपली बातमी कुठेतरी छापून येईल याची खबरदारी घेतली म्हणजे क्रांतिकारी असण्यामागचा आपला हेतू सफल झाला असं म्हणायला हरकत नाही.) तर नावांच्या बाबतीत माझ्या मित्राचं म्हणणं इतकं विचित्र आहे! हा मित्र म्हणतो , ‘ नावात काही नसेल तर मी माझ्या मुलांना नंबराने संबोधलं तर चालेल का ? ए १७२ , डुकरासारखा लोळत काय पडलायस ? ३४० तू जर १७२ च्या नादी लागलास तर तूही त्याच्यासारखा आळशी होशील. तो शेजारचा ४२० बघ कसा गुणी मुलगा आहे! तो आणि त्याचा भाऊ ५६० परीक्षेत कसे मार्कस् मिळवतात...

बोली भाषांच्या संवर्धनासाठी...इरगोंडा पाटील

Image
भाषेचा जन्म बोलण्यासाठी झालेला असल्याने त्याचे मूळ स्वरूप हे बोली असेच असते. त्यामुळे सर्वच भाषा या प्रथम बोली आहेत. भाषा ही भाषाच असते, ती शुद्ध अगर अशुद्ध असत नाही. तरीही भाषेच्या प्रमाणीकरणाची गरज शिक्षण आणि व्यवहारासाठी आवश्‍यक असते. जगभर ज्ञानाचा व्यवहार करणारा एक अभिजात वर्ग आहे. हा संख्येने कमी असला, तरी सत्ताधारी असतो. त्यामुळे ज्ञानाचा व्यवहार करणाऱ्या अभिजनांची बोली हीच त्यांनी प्रमाण भाषा बनवली. त्याच भाषेची जी विविध रूपे असतात, त्यांना ज्ञानाच्या व्यवहाराची भाषा म्हणून स्थान मिळाले नाही. या सर्व बहुजनांच्या बोली आहेत.  मराठीतील प्रमाण भाषा ही अभिजनांची बोली आहे. तीच आज शिष्ट भाषा म्हणून शिक्षणाची भाषा म्हणून मान्य आहे. मराठीच्या विविध बोली या मराठीची विविध रूपे आहेत. बहुजन दैनंदिन व्यवहार याच बोलीतून करतो. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे जगभरच्या बोली भाषा मृत्यूपंथाला लागतील, असे भाषावैज्ञानिक सांगत आहेत. या बोलीभाषांच्या संवर्धनासाठी ‘युनेस्को’ने योजना तयार केली आहे. केंद्र सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत. या मलमपट्ट्या आहेत. प्रत्येक भाषेच्या अस्तित्वास...

गरीब ज्वारीचे भरजरीपण-अशोक तुपे

Image
खेळात कुस्ती , लोककलेत लावणी , अध्यात्मात अभंग तसे पिकात ज्वारी हे महाराष्ट्राचे वैभव. गहू आला मेक्सिकोतून , पण जोंधळा अस्सल मराठमोळा. हरितक्रांतीनंतर मात्र या वैभवाला उतरती कळा लागली. त्यात पंजाबमुळे गहू , तर दक्षिणेमुळे तांदूळ रेशिनगवर दिला गेला. तेथे ज्वारीला डावलले. चपाती हे श्रीमंतांचे तर भाकरी हे गरिबांचे खाणे. राजकीय अजेंडय़ावर बागायती पिकांची जशी बाजू घेतली जाते तसे जिराईत असल्याने ज्वारीला कुणाचाच आधार नव्हता. गेली ५० वष्रे उपेक्षा होत असलेल्या जोंधळ्याला आता लोकाश्रयाचा आधार मिळू लागला आहे. एवढेच नव्हे तर बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही ज्वारीने भुरळ घातली आहे! वजन कमी करण्याचे फॅड आता आले असल्याने अनेक जण ज्वारीलाच प्राधान्य देतात. ग्लुटेन नसल्याने ज्वारी पचायला सोपी असते. अ‍ॅसिडिटी होत नाही. त्यामुळेच आता लोकांना जुने ते सोने या उक्तीप्रमाणे ज्वारीचे महत्त्व कळू लागले आहे. हैदराबाद येथे राष्ट्रीय ज्वारी संशोधन केंद्र आहे. यापूर्वीचे संचालक व शास्त्रज्ञ डॉ. जे. व्ही. पाटील यांच्या पुढाकारातून या संस्थेबरोबर ब्रिटानियाने करार केला. ज्वारीची बिस्किटे निर्मितीच्या तंत्रज्ञानाकरिता त्...

आमीर खाँ पे बाते करते है…– मिलिंद शिंदे .

क्या कर रहा है …? कुछ नहीं यार , चार घंटेसे स्क्रोल कर रहां हूँ … मुँह से नही बस उंगलीयोंसे बोल रहा हूँ … हं … चल , फेसबुक पे कुछ पोस्ट डाल देतें है पाच-पच्चीस LIKES तो ऐसे मिल जाते है थोड तेल तू डाल , लोग तो पुरा डीब्बाही खाली करते है … चल कुछ चटपटी बाते करते है … आमीर खाँ पे बाते करते है … जो कुछ चल रहा है उसपे बोलता जा अपने मन के पट बेलगाम खोलता जा डाल दे कुछ भी अपडेट लोक भी खुद को अपडेट की फिक्र मे रहते है दोन मिनट रुक … चल आजा अब कमेंट चेक करते है … हा … हा … हा … चल कुछ चटपटी बातें करते है … आमीर खाँ पे बाते करते है … कोई सहिष्णू , कोई असहिष्णू हमे क्या फर्क पडता है.. बहते पानी मे हात धोते है … थोडा माहौल पैदा करते है … जुमला फिट्ट हो जाए तो बवाल पैदा करते है चलकुछ चटपटी बाते करते है … आमीर खाँ पे बाते करते है … अरे क्या बात कर रहा है …? पढाई-लिखाई , काम-धाम होता रहेगा … फेसबुक की हर गती-विधीमे शामील होना हमारा काम है … अपने मे मशगुल रहना बस इसीमे अपना नाम है तुम तुम्हारा काम संभालो , हम हमारा संभालेंगे चाहे घटना मूल मालूम हो ना हो … हम तो पोस्...