यंत्रयुगाची आधारभूत वस्तू- चक्र
चक्र किवा चाकं हा माणसानं लावलेला अत्यंत महत्त्वाचा तसाच मूलगामी यांत्तिक शोध म्हणता येईल. एखादी अवजड वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेताना माणसांची शक्ती अपुरी पडत असेल तर गोलाकार वस्तूंवर ती चढवून ढकलत पुढं नेता येऊ शकते, हा आज साधा, सरळ आणि सोपा उपाय सुचायला मानवानं काही शतकं घेतली असणार, यात काय शंका? पण एकदा का ही यांत्तिक क्लृप्ती माणसाच्या ध्यानी आली, चाकाशिवाय एखादंसुद्धा यंत्र सापडणं कठीण, अशीच अवस्था झाली. युरोपात घडून आलेल्या औद्योगिक क्रांतीनंतर तर लहान-मोठ्या घड्याळाच्या काट्यापासून ते मोटरकार तसंच जेट इंजिन आणि संगणकाच्या 'डिस्क ड्राइव्ह' पर्यंत चाकाचाच वापर होत राहिला आहे. केंद्रबिदूभोवती म्हणजे अक्षाभोवती किवा आसाभोवती फिरणारं चाक हेच तत्त्व वापरलं जात आहे. इसवी सन पूर्व सुमारे ३५०० वर्षांपूर्वी मेसापोटेमियात (म्हणजे आताच्या इराकमध्ये) मातीची भांडी बनवणाऱ्या कंुभाराच्या चाकाचं अस्तित्व पुरातत्व संशोधकांना सापडलं आहे. या मेसापेटोमियातच इ.स. पूर्व ३२०० च्या सुमारास चाकाच्या साह्यानं चालणारे 'रथ' होते, असंही आढळून आलं आहे. अवजड सामान एका ठिकाणाहून दुसऱ...