Posts

अट्टल- किशोर पाठक

परवापरवाची गोष्ट. संक्रांतीला विदांना एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मुंबईत गेलो. फक्त ब्याण्णव वर्षांचे तृप्त विदा. कायम स्वत:त मग्न नजर. तळाचा वेध घेत जाणारी. खास कोकणी तुकतुकीत रंग. वय उतरत गेलेलं तरीही चेहऱ्यावर, शरीरावर दुधावरच्या घट्ट सायीसारखी घनदाट कांती. पांढरी बंडी, गोल ढोपरावर सरकलेला लेंगा आणि थकलेला धीरगंभीर अनुनासिक स्वर ! पहिला प्रश्न, 'जेवलात?' नंतर पाणी. तब्येतीमुळे कार्यक्रमास येण्यास नम्र नकार. नंतर म्हणाले, 'तीळगूळ घेऊन जा.' संथ चालीत स्वत: चालत विदा आत गेले. तीळगुळाचा लाडू हातावर ठेवला. मी नमस्कार केला. म्हणाले, 'नमस्कार करू नका.' म्हटलं, 'का? असे पाय आता कमी आहेत ज्यांच्यावर डोकं टेकावं.' तसे म्हणाले, 'सांगतो. डोकं टेकावं अशी माणसं तीनच ! एक साने गुरुजी, दुसरे सेनापती बापट, तिसरे बाबा आमटे !' नंतर क्षणभर थांबले आणि म्हणाले, 'बाकीचे आहेत पण नमस्कार केल्यावर हात धुवून घ्यावे लागतात...' हा खास विदांचा स्पर्श, रोखठोक, शब्दांना खरबरीत करणारा, भावनांना कोरडेपणा नाही तर नेमकेपणाने धार देणारा, खमक्या आणि अट्टल...

'मरतुकड्या' समाजाची भाषा कशी जगेल?- अनंत सामंत

प्रश्नांची मांडणी आपण नेहमीच चुकीच्या दिशेने करीत असतो. भाषेचे जतन, संवर्धन आपण कसे करणार? भाषा समाजाचे संवर्धन करीत असते. त्यामुळे समाजाचे जतन, संवर्धन झाले की आपोआपच भाषेचेही जतन, संवर्धन होते. भाषेमुळे समाजाची संस्कृती तयार होते. तो समाज प्रगल्भ होतो. भाषेमुळेच त्याला प्रेरणा मिळते. जो समाज आपली भाषा सोडतो तो त्याच्या अस्तित्वालाच मुकतो. आईच्या हातचे जेवण नाकारून, घरचे जेवण सोडून जो केवळ फास्टफूडवरच जगतो त्याच्या अंगावर अनावश्यक सूज वाढते. अकाली मृत्यूलाही त्याला सामोरे जावे लागते. ज्यावर तुमचे भरण-पोषण होते तसेच परिणाम तुम्हाला पाहायला मिळतात. आईच्या हातच्या जेवणाचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही; पण स्वत:च्या जीवनाचे महत्त्व कळणेही गरजेचे आहे. ज्या समाजात आपण राहतो तो समाज टिकवा, त्याचे संवर्धन करा. भाषेचे जतन, संवर्धन करण्याची गरजच राहणार नाही. ते आपोआपच होईल. समाजातील काही घटक, तरुण पिढी काही वेळा समाजापासून वेगळे व्हायला लागतात. असे का व्हावे? - समाजाला अभिमान वाटावा असे काहीतरी त्या समाजात सापडले पाहिजे. तसे काहीच जर सापडले नाही, तसे आदर्श व्यक्तीला समाजातून मिळाले ...

आपल्या मुलांना मराठी शिकवण्यात लाज कसली?- अरुण ठाकूर

तुम्ही अलीकडच्या काळात कधी पुस्तकाच्या दुकानात गेला होतात? म्हणजे क्रॉसवर्डमध्ये नाही, मराठी पुस्तकांच्या दुकानात? किंवा पुस्तकांच्या जाहिराती पाहिल्या आहेत? त्यात बहुसंख्य मराठी पुस्तके अनुवादित असतात ! सगळ्यात जास्त पुस्तके आहारशास्त्र, व्यक्तिमत्त्व विकास, श्रीमंत कसे व्हावे आणि झटपट इंग्रजी कसे बोलावे या विषयांवर असतात. चांगली मराठी कादंबरी आपण कधी वाचली होती हे तुम्हाला सहजासहजी आठवते का? एकूणच मराठी साहित्य रोडावले आहे, कारण मराठीचा परीघच आक्रसला आहे. आज मराठी ही मोलकरणींशी बोलण्याची भाषा आहे. या मोलकरणींनाही इंग्रजी शिकवले की तिही गरज संपेल आणि खऱ्या अर्थाने आपण जागतिकीकरण साध्य करू असे आपल्याला वाटते. मराठीची ही हीनदीन अवस्था काही अचानक झालेली नाही. मराठीत शिकलेल्या लोकांचा आत्मविश्वास खचला म्हणून मराठीची आज अशी गत झालेली आहे. १९२७ पर्यंत महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणही मराठीत दिले जात होते. आज आपण ज्या हिंदी भाषकांच्या नावाने बोटे मोडतो, त्या हिंदी भाषकांनी आजही संपूर्ण हिंदीत अभियांत्तिकीचे शिक्षण देण्याची व्यवस्था केलेली आहे. पण मराठी लोकांना मात्र आपली भाषा ही ज्ञानभाषा हो...

।। आहार हेच औषध।। (न्यूट्रास्यूटिकल्स) -डॉ. उल्हास कोल्हटकर

आहारशास्त्र हे एकमेव असे शास्त्र असावे की ज्यात आपणाला सर्व काही कळते अशी आपल्यापैकी बऱ्याच जणांची समजूत असते. दुर्दैवाने परिस्थिती बहुसंख्य वेळा उलटीच असते. आधुनिक तंत्र-विज्ञानामुळे आरोग्य शास्त्राची व आधुनिक वैद्यकाची क्षितिजे विस्तारू लागल्यापासून तर, आहारशास्त्र अधिकाधिक प्रगत व गुंतागुंतीचे होऊ लागले आहे.केवळ पोषणापुरत्याच त्याच्या मर्यादा न राहता, विविध आजारांच्या उपचारांमध्ये व रोगप्रतिबंधनामध्येही ‘आहारा’ची भूमिकाही अधिक ठळक होऊ लागली आहे. जणुकीय पाश्र्वभूमी लाभलेल्या जीनॉमिक्स (GENOMICS) च्या सहाय्याने उपचारांमध्ये अतिविशिष्ट वैयक्तिक आहाराचा (Personalised Food Therapy) उपयोग हे आहारशास्त्राचे एक नवे क्षितीज. या सर्व घडामोडींना, विशेष करून आहाराचा औषध म्हणून उपयोग करण्याच्या शास्त्राचे विशेषकरून आहाराचा औषध म्हणून उपयोग करण्याच्या शास्त्राचे सन १९८९ मध्येच ‘फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन इन मेडिसीन’ यू.एस..च्या संस्थापक चेअरमन डॉ. स्टीफन डिफेलिस यांनी छान बारसे केले आहे व ते म्हणजे- न्यूट्रास्यूटिकल्स- न्यूट्रिशन + फार्मास्युटिकल्स- आहार + औषध! तसे पाहिले तर गेल्या काही शतकातील आहारा...

शैक्षणिक क्रांतीचा एक नवा धडा

विदेशी विद्यापीठांना भारतात आपली संकुले स्थापन करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. संसदेच्या चालू अधिवेशनात यासंबंधातल्या विधेयकाला मंजुरी मिळाल्यावर विदेशी विद्यापीठांच्या भारतातील प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल. या प्रस्तावाला डावे पक्ष, बहनजी मायवतींचा बहुजन समाज पक्ष, फुटून चिंध्या झालेला मुलायमसिंग यादव यांचा समाजवादी पक्ष व लालूंचा राजद या पक्षांनी विरोध दर्शविला आहे. प्रमुख विरोधी पक्ष भाजपने या विधेयकाबाबत अजून आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली तरी या विधेयकाला त्यांचा पाठिंबाच असेल असे सध्या तरी दिसते. त्यामुळे संसदेत हे विधेयक मंजूर होण्यात काही अडचण येईल, असे दिसत नाही. यापूर्वीही कॉँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील यु.पी.ए. सरकारने २००७ साली याच आशयाचे विधेयक मंत्रिमंडळात मंजूर केले होते. परंतु त्यावेळी सरकारला टेकू देणाऱ्या डाव्या पक्षांनी या विधेयकाला संसदेचा दरवाजाच दाखविला नाही व अशाप्रकारे या होऊ घातलेल्या शैक्षणिक क्रांतीचा डाव्यांनी गर्भपात केला होता. आता मात्र हे विधेयक मंजूर झाल्यास देशात शैक्षणिक क्रांतीच्या एका नव्या धडय़ाची सुरुवात होईल हे निश्चित....

जगाचे उत्पादन केंद्र भारत

हे खरे आहे की, पुढल्या १० वर्षांत भारत वैश्विक उत्पादन केंद्र बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करतो आहे. आजवर आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात प्रमुख घटक शेती हाच होता. औद्योगिक उत्पादन दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर होते. आता गेल्या १० वर्षांत प्रथमच औद्योगिक उत्पादनाने राष्ट्रीय उत्पन्नातील आपला वाटा शेतीपेक्षा अधिक ठेवला आहे आणि तो येणाऱ्या काळात अधिक वेगाने वाढणार आहे. भारतातील आर्थिक उदारीकरणानंतर आपले औद्योगिक क्षेत्र वेगाने विस्तारू लागले. औद्योगिक उत्पादनातील प्रमुख सात क्षेत्रांत आपले उद्योग जागतिक क्रमवारीत पहिल्या १२ मध्ये पोचले आहेत. कापड उद्योग तर आजही चौथ्या क्रमांकावर आहे आणि इलेक्ट्रिकल मशिनरी उद्योग पाचवे स्थान पटकावून आहे. मशिनरी, इक्विपमेंटस् आणि मोटारी परदेशातूनच आणायच्या असतात असे आजवर आपण समजत होतो. आता या क्षेत्रातही भारत १२ व्या क्रमांकावर पोचला आहे. १९९९-२००० मध्ये आपण ४.८ दशलक्ष वाहने तयार करीत होतो. ही संख्या आता तिप्पट होऊन १२ दशलक्षांवर पोचली आहे. वाहनांच्या निर्यातीतही भारत आता आशियातील चौथा महत्त्वाचा देश गणला जातो. औद्योगिक उत्पादनाच्या विविध क्षेत्रांत आपले उद्योज...

मराठी मनातला गोंधळ

प्रत्येकालाच आपली भाषा प्रिय असते. पण सध्याचं भाषेवरून चाललेलं राजकारण पाहता नेमकं कळत नाही की आपण आपल्या भाषेचा बाळगतो तो अभिमान आहे की दुराभिमान? भाषा ही आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा घटक वगैरे असते, असं म्हणतात. पण संस्कृती ही आपल्या वेगळ्या अस्तित्वाची ओळखच ना? मग या संस्कृतीवर दुसऱ्या संस्कृतीचं आक्रमण, म्हणजे आपल्या अस्तित्वालाच धोका, असं समजलं तर कुठं काय बिघडलं? दुसऱ्या एखाद्या भाषेचं आपल्या भाषेवर आक्रमण होत असेल तर साहजिकच एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. आपली अस्मिता जपण्यासाठी धडपड सुरू होते. प्रसंगी त्याचं रूपांतर वादात होतं. यातूनच पुढे युद्ध वगैरे झाल्याची उदाहरणंही आमच्या तरुण पिढीच्या तोंडावर फेकली जातात. पण त्याला आम्ही काय करायचं? पंगा नको, म्हणून अतिक्रमण सहन करायचं? त्यात हल्ली आम्हाला ग्लोबलायझेशनचं एक नवं लेबल चिकटलंय. काय म्हणे तर जागतिकीकरणामुळं जग जवळ आलंय. वर प्रसारमाध्यमांची आणि संवादाची क्रांती झालीय म्हणे. हे असे शब्द वापरणारे पुढे जाऊन असंही सांगतात की सांस्कृतिक देवाण-घेवाण वगैरे सुरू झालीय. सब झूठ! अशी देवाण-घेवाण होत असती तर युद्ध आणि दहशतवाद र...