Posts

सर्च ‘डिजिटल व्हिजन'-विनायक परब

आजचे युग ‘डिजिटल’ आहे. पण राज्यकर्त्यांना त्याची पुरेशी जाणीव नाही. चार-दोन उपक्रम इंटरनेटवर सुरू झाले, की आपण माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असल्याचा आभास तयार होतो. पण माहिती तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा पाच टक्केही वापर आपण आजतागायत केलेला नाही. राज्यातील सर्वाना स्वस्त दरात इंटरनेट अ‍ॅक्सेस मिळवून देणे आणि राज्यभाषेतील ‘कंटेन्ट क्रिएशन’ या दोन बाबींकडे तरी राज्य शासनाने प्रकर्षांने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला आता गरज आहे- ‘डिजिटल व्हिजन’ची! ‘गिव्ह अस द व्हिजन दॅट वी मे नो व्हेअर टू स्टँड अ‍ॅण्ड व्हॉट टू स्टँड फॉर. बिकॉज अनलेस वी स्टँड फॉर समथिंग, वी विल फॉल फॉर एव्हरीथिंग !’ पीटर मार्शल यांचे हे विधान जगभरात गाजले. कारण माणूस, संस्था, राज्य अथवा देश यांना व्हिजन म्हणजे दूरदर्शीपणा का, कसा व किती गरजेचा असतो, हे त्यांनी नेमक्या शब्दांत सांगितले. वर्धापन दिनाच्या दिवशी सारे जण आपल्या यशाचे मूल्यमापन करतात. पण त्याच बरोबर गरज असते ती भविष्यातील वाटचालीच्या दिशादर्शनाची. आज सुवर्णमहोत्सव साजरा करणारा महाराष्ट्र काय अवस्थेत आहे? म...

मॅनेजमेंट महागुरू!

‘मॅनेजमेंट’ ही कला आहे की शास्त्र? गेल्या तीन दशकांत आणि विशेषत: जागतिकीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्यानंतर ‘मॅनेजमेंट’ नावाच्या ज्ञानशाखेला अतोनात महत्त्व प्राप्त झाले. गेल्या १० वर्षांत ‘व्यवस्थापन’ हा विषय शिकविणाऱ्या मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट्सचे तर एक पेवच फुटले. भारतातील काही शिक्षणसम्राटांनी ‘एमबीए’ पदव्या देणारी, भलीमोठी फी आकारणारी एक जंगी फॅक्टरीच सुरू केली. उद्योग आणि व्यापार कमी असूनही त्यांचे व्यवस्थापन शिकलेले पदवीधर समाजात दिमाखात फिरू लागले. भले भले सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, आर्किटेक्ट्स आणि मेडिकल डॉक्टर्सही ‘एमबीए’ होऊ लागले. ‘एमबीए’ शिक्षित इंजिनीअर आणि तोही अमेरिकेतील पदवीधर असेल तर तो स्वत:ला ‘सुपरब्राह्मण’ समजू लागला. भांडवलदारांना भांडवलशाही आणि व्यापाऱ्यांना धंदा करण्याची कला शिकविणारे हे ‘सुपरब्राह्मण’ हवेतच चालू लागले. पण त्यांना जमिनीवर उतरविणारा, जगातील गरिबीचे, विषमतेचे, अन्यायाचे, उपेक्षेचे भान देणारा ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणजे शनिवारी निधन पावलेले सी. के. प्रल्हाद! कोईमतूर कृष्णराव प्रल्हाद म्हणजे सी. के. प्रल्हाद. प्रल्हाद यांच्या नावातील पहिले आद्याक्षर ‘सी’...

भाववाढीचे राजकीय अर्थशास्त्र

जीवनोपयोगी वस्तूंची आणि खास करून खाद्यान्नाची भाववाढ अर्निबध पद्धतीने सुरू राहाते, तेव्हा त्याची आंच समाजातील सर्वच घटकांना जाणवते. अगदी अंबानी बंधूंसारखे अब्जाधीशही या भाववाढीमुळे कामगारांच्या वेतनात वाढ होऊन परिणामी आपला नफ्याचा दर घटेल, या भीतीने थोडेफार सचिंत होत असतील. स्थिर उत्पन्न असणारी गोरगरीब प्रजेला किमान नजीकच्या काळात तरी वाढती उपासमार सहन करण्यावाचून दुसरा पर्याय उपलब्ध नसतो. अशी भाववाढ करण्यामागे कोणत्या शक्ती कार्यरत आहेत, याचे ज्ञान या महागाईच्या खाईत होरपळून निघणाऱ्या माणसाला नसते. अगदी विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी परीक्षा पास झालेल्या उच्चशिक्षित माणसालाही अभ्यासक्रमाद्वारे मिळणारे ज्ञान मर्यादित असते. तो वस्तूंचे भाव मागणी आणि पुरवठा यांच्या संतुलनाद्वारे निश्चित होतात, असे शिकलेला असतो. पण ते पूर्ण सत्य नव्हे. कारण बाजारपेठेतील पुरवठा कमी वा जास्त करून वस्तूंच्या ‘नैसर्गिक’ किमतीत फेरफार करण्याची कुवत वस्तूंचे उत्पादक वा वितरक यांच्यामध्ये असते. ज्या वस्तूंचे भाव वाढतात त्या वस्तूंचे उत्पादक वा वितरक यांचा भाववाढीमुळे आर्थिक लाभ होतो हे उघडच आहे. तसेच या ...

बजेटची गोष्ट

फेब्रुवारी महिन्यातील सर्वात महत्त्वाचा इव्हेंट म्हणजे बजेट अर्थात अर्थसंकल्प. अर्थसंकल्प हा सरकारचा वार्षिक उपक्रम असून गरीब, श्रीमंत सारेच त्याच्या प्रतीक्षेत असतात. अर्थसंकल्प किवा बजेट हा शब्द मध्ययुगीन काळातील इंग्लिशमधील बॉगेट (bowgette) या शब्दाचे सुधारित रूप आहे. हा शब्दही मध्यकाळातील फ्रेंच भाषेतील (bougette) या शब्दापासून आला आहे. या शब्दाचा मूळ अर्थ चामड्याची बॅग असा होतो. अलीकडच्या काळात अर्थसंकल्प फेब्रुवारीत सादर करण्यास सुरुवात झाली. मात्र, बजेटचा थोडा मागे जाऊन इतिहास रंजक आहे. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला तो २६ नोव्हेंबर १९४७ रोजी. तत्कालीन पहिले अर्थमंत्री सर आर.के. षण्मुगम चेट्टी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. १९४४ च्या 'बॉम्बे प्लॅन'च्या धर्तीवर हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलाहोता. जॉन मथाई, जी.डी.बिर्ला आणि जे.आर.डी. टाटा यांनी एकत्रितरीत्या तो तयार केला होता. या पहिल्याच अर्थसंकल्पात देशाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता आणि कोणत्याही प्रकारचे आर्थिक धोरण मांडण्यात आले नव्हते. १९५० - ५१ च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमं...

अट्टल- किशोर पाठक

परवापरवाची गोष्ट. संक्रांतीला विदांना एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मुंबईत गेलो. फक्त ब्याण्णव वर्षांचे तृप्त विदा. कायम स्वत:त मग्न नजर. तळाचा वेध घेत जाणारी. खास कोकणी तुकतुकीत रंग. वय उतरत गेलेलं तरीही चेहऱ्यावर, शरीरावर दुधावरच्या घट्ट सायीसारखी घनदाट कांती. पांढरी बंडी, गोल ढोपरावर सरकलेला लेंगा आणि थकलेला धीरगंभीर अनुनासिक स्वर ! पहिला प्रश्न, 'जेवलात?' नंतर पाणी. तब्येतीमुळे कार्यक्रमास येण्यास नम्र नकार. नंतर म्हणाले, 'तीळगूळ घेऊन जा.' संथ चालीत स्वत: चालत विदा आत गेले. तीळगुळाचा लाडू हातावर ठेवला. मी नमस्कार केला. म्हणाले, 'नमस्कार करू नका.' म्हटलं, 'का? असे पाय आता कमी आहेत ज्यांच्यावर डोकं टेकावं.' तसे म्हणाले, 'सांगतो. डोकं टेकावं अशी माणसं तीनच ! एक साने गुरुजी, दुसरे सेनापती बापट, तिसरे बाबा आमटे !' नंतर क्षणभर थांबले आणि म्हणाले, 'बाकीचे आहेत पण नमस्कार केल्यावर हात धुवून घ्यावे लागतात...' हा खास विदांचा स्पर्श, रोखठोक, शब्दांना खरबरीत करणारा, भावनांना कोरडेपणा नाही तर नेमकेपणाने धार देणारा, खमक्या आणि अट्टल...

'मरतुकड्या' समाजाची भाषा कशी जगेल?- अनंत सामंत

प्रश्नांची मांडणी आपण नेहमीच चुकीच्या दिशेने करीत असतो. भाषेचे जतन, संवर्धन आपण कसे करणार? भाषा समाजाचे संवर्धन करीत असते. त्यामुळे समाजाचे जतन, संवर्धन झाले की आपोआपच भाषेचेही जतन, संवर्धन होते. भाषेमुळे समाजाची संस्कृती तयार होते. तो समाज प्रगल्भ होतो. भाषेमुळेच त्याला प्रेरणा मिळते. जो समाज आपली भाषा सोडतो तो त्याच्या अस्तित्वालाच मुकतो. आईच्या हातचे जेवण नाकारून, घरचे जेवण सोडून जो केवळ फास्टफूडवरच जगतो त्याच्या अंगावर अनावश्यक सूज वाढते. अकाली मृत्यूलाही त्याला सामोरे जावे लागते. ज्यावर तुमचे भरण-पोषण होते तसेच परिणाम तुम्हाला पाहायला मिळतात. आईच्या हातच्या जेवणाचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही; पण स्वत:च्या जीवनाचे महत्त्व कळणेही गरजेचे आहे. ज्या समाजात आपण राहतो तो समाज टिकवा, त्याचे संवर्धन करा. भाषेचे जतन, संवर्धन करण्याची गरजच राहणार नाही. ते आपोआपच होईल. समाजातील काही घटक, तरुण पिढी काही वेळा समाजापासून वेगळे व्हायला लागतात. असे का व्हावे? - समाजाला अभिमान वाटावा असे काहीतरी त्या समाजात सापडले पाहिजे. तसे काहीच जर सापडले नाही, तसे आदर्श व्यक्तीला समाजातून मिळाले ...

आपल्या मुलांना मराठी शिकवण्यात लाज कसली?- अरुण ठाकूर

तुम्ही अलीकडच्या काळात कधी पुस्तकाच्या दुकानात गेला होतात? म्हणजे क्रॉसवर्डमध्ये नाही, मराठी पुस्तकांच्या दुकानात? किंवा पुस्तकांच्या जाहिराती पाहिल्या आहेत? त्यात बहुसंख्य मराठी पुस्तके अनुवादित असतात ! सगळ्यात जास्त पुस्तके आहारशास्त्र, व्यक्तिमत्त्व विकास, श्रीमंत कसे व्हावे आणि झटपट इंग्रजी कसे बोलावे या विषयांवर असतात. चांगली मराठी कादंबरी आपण कधी वाचली होती हे तुम्हाला सहजासहजी आठवते का? एकूणच मराठी साहित्य रोडावले आहे, कारण मराठीचा परीघच आक्रसला आहे. आज मराठी ही मोलकरणींशी बोलण्याची भाषा आहे. या मोलकरणींनाही इंग्रजी शिकवले की तिही गरज संपेल आणि खऱ्या अर्थाने आपण जागतिकीकरण साध्य करू असे आपल्याला वाटते. मराठीची ही हीनदीन अवस्था काही अचानक झालेली नाही. मराठीत शिकलेल्या लोकांचा आत्मविश्वास खचला म्हणून मराठीची आज अशी गत झालेली आहे. १९२७ पर्यंत महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणही मराठीत दिले जात होते. आज आपण ज्या हिंदी भाषकांच्या नावाने बोटे मोडतो, त्या हिंदी भाषकांनी आजही संपूर्ण हिंदीत अभियांत्तिकीचे शिक्षण देण्याची व्यवस्था केलेली आहे. पण मराठी लोकांना मात्र आपली भाषा ही ज्ञानभाषा हो...