Posts

व्यावसायिक शिक्षण : खरोखरच किती व्यावसायिक?- मनोज अणावकर

अभ्यासक्रम आणि त्याचे प्रत्यक्ष उपयोजन करताना त्या क्षेत्रात आवश्यक ठरणारे ज्ञान यात फार मोठी तफावत दिसून येते. आणि मग यातूनच घडतात कमी ताकदीचे व्यावसायिक. शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांची अनास्था याची कारणमीमांसा आणि त्यावरील उपाययोजनांवर एक दृष्टिक्षेप- आज पुन्हा एकदा नोकरीसाठी मुलाखत देऊन आलेल्या शिरीषचा पडलेला चेहरा खरं तर मुलाखतीचा निकाल स्पष्टपणे सांगून जात होता. पण तरीही न राहवून त्याच्या वडिलांनी विचारलंच, ‘‘का रे, आज काय कारण झालं?’’ त्यावर शिरीषने चिडून सांगितलं, ‘‘काही नाही, तीच ती कारणं. कोणाला जास्त टक्केवारी पाहिजे, तर कोणाला जास्त अनुभव पाहिजे. कोणाला मी त्यांच्या जॉबसाठी योग्य वाटत नाही, तर कोणी म्हणतो नोकरी देतो, पण स्टेटस्चं काम देत नाही आणि पगारही १०-१२ हजार रुपये सांगतात. बारावीपासून क्लास, कॉलेज शिक्षणासाठीचे इतर खर्च यावर लाखो रुपये खर्च करून दिवस-रात्र शिक्षणासाठी एवढी मेहनत घेतली. पण वेळ, मेहनत आणि पसा सगळं वाया गेलं.’’ हे अशा प्रकारचे संवाद अनेक घरांमधून आज ऐकायला मिळतात. व्यावसायिक अभ्यासक्रम, मग तो कोणताही असो, अभियांत्रिकीचा, व...

ढगांना..

मित्रानो हा पावसाळा आला कधी आणि संपला कधी हेच काही कळले नाही. हवामान खात्याच्या माहितीनुसार (?) आता मान्सून राजा परतीच्या मार्गावर आहे आणि १ आठवड्याच्या आत तो उत्तरेकडून खाली दक्षिण भारतातून परत जाईल  असे कळते.पण काही मोजके गाव/तालुके/जिल्हे सोडले तर  बाकी इतर सर्व ठिकाणी अवस्था फार फार बिकट आहे.पाऊस  सुरु असून ही  काही ठिकाणी पानी आणि चाराच्यी स्थिती  आत्ताच गंभीर आहे. नोकरी धंदा  करणारया व्यक्ती / कुटुंबांना  याची झळ कितपत जाणवेल याची शंका आहे पण शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेले इतर घटक यांच्या पोटात आत्ताच गोळा आला आहे हे निश्चित .सण वार अजून नुकेतच सुरू झालेले आहेत पण जर तुम्ही जरा शहराच्या बाहेर जाऊन बघितले तर खरी अवस्था काय आहे  हे ध्यानात यायला फार वेळ लागणार नाही हे नक्की(अर्थात जे ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांना फार काही सांगण्याची गरज नाही) बघूया काय होणार आहे ते नजीकच्या भविष्य काळात. पण या क्षणाला मला कवी सौमित्र यांनी लिहलेली अत्यंत  हृदयस्पर्शी कविता आठवते आहे. "नांगरून ठेवल्या शेतांवरती येण्याआधी दाटून कोरडय़ाठण्ण पड...

कर्ते आणि नुसतेच करविते- गिरीश कुबेर

उत्पादन करणं, वस्तू निर्माण होणं, याला असलेलं महत्त्व कमी होणार नाही. गेल्या काही वर्षांत मात्र, या ‘वेल्थ क्रिएशन’पेक्षा , संपत्तीच्या प्रत्यक्ष निर्मितीपेक्षा ती वाढलेली असल्याचे देखावे निर्माण करणाऱ्यांनाही महत्त्व आलं. व्यवहार वाढणारच, पण ते फुगवले गेले की फुगा फुटतो. तसा तो फुटलाही. या फुटलेल्या फुग्याची हवा आत्ता आपल्या अवतीभोवती असताना, कर्ते आणि करविते यांमधला फरकही सहज दिसतो आहे.. परवा एका बडय़ा बहुराष्ट्रीय बँकेत काम करणारा मित्र भेटला. सगळय़ा रडगप्पाच सांगत होता. आर्थिक स्थिती किती वाईट आहे..धंदाच नाही.. अर्थव्यवस्था एकदम संकटात आहे.. बँकेतून अडीचशे जणांना काढतायत, वगैरे. शेवट या मुद्दय़ावर.. आमचा क्रमांक कधी येतोय, माहीत नाही. दचकायलाच झालं एकदम. मित्र उत्तम शिकलेला. आई-वडिलांनी अगदी कर्ज वगैरे काढून त्याला चांगल्या नावाजलेल्या कॉलेजातून व्यवस्थापन शिक्षण दिलं. तिथनं हा बाहेर आला तोच टाय घालून. मग सगळं त्याचं ठरल्यासारखं. आधी यूटीआय, आयसीआयसीआय.. मग रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड.. एचएसबीसी.. गोल्डमन सॅक असं काय काय. एका वर्षांत तीन बेडरूम फ्लॅट. पार्किंगसकट. सोसायटीत जॉगिंग पार्क, क्...

सर्च ‘डिजिटल व्हिजन'-विनायक परब

आजचे युग ‘डिजिटल’ आहे. पण राज्यकर्त्यांना त्याची पुरेशी जाणीव नाही. चार-दोन उपक्रम इंटरनेटवर सुरू झाले, की आपण माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असल्याचा आभास तयार होतो. पण माहिती तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा पाच टक्केही वापर आपण आजतागायत केलेला नाही. राज्यातील सर्वाना स्वस्त दरात इंटरनेट अ‍ॅक्सेस मिळवून देणे आणि राज्यभाषेतील ‘कंटेन्ट क्रिएशन’ या दोन बाबींकडे तरी राज्य शासनाने प्रकर्षांने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला आता गरज आहे- ‘डिजिटल व्हिजन’ची! ‘गिव्ह अस द व्हिजन दॅट वी मे नो व्हेअर टू स्टँड अ‍ॅण्ड व्हॉट टू स्टँड फॉर. बिकॉज अनलेस वी स्टँड फॉर समथिंग, वी विल फॉल फॉर एव्हरीथिंग !’ पीटर मार्शल यांचे हे विधान जगभरात गाजले. कारण माणूस, संस्था, राज्य अथवा देश यांना व्हिजन म्हणजे दूरदर्शीपणा का, कसा व किती गरजेचा असतो, हे त्यांनी नेमक्या शब्दांत सांगितले. वर्धापन दिनाच्या दिवशी सारे जण आपल्या यशाचे मूल्यमापन करतात. पण त्याच बरोबर गरज असते ती भविष्यातील वाटचालीच्या दिशादर्शनाची. आज सुवर्णमहोत्सव साजरा करणारा महाराष्ट्र काय अवस्थेत आहे? म...

मॅनेजमेंट महागुरू!

‘मॅनेजमेंट’ ही कला आहे की शास्त्र? गेल्या तीन दशकांत आणि विशेषत: जागतिकीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्यानंतर ‘मॅनेजमेंट’ नावाच्या ज्ञानशाखेला अतोनात महत्त्व प्राप्त झाले. गेल्या १० वर्षांत ‘व्यवस्थापन’ हा विषय शिकविणाऱ्या मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट्सचे तर एक पेवच फुटले. भारतातील काही शिक्षणसम्राटांनी ‘एमबीए’ पदव्या देणारी, भलीमोठी फी आकारणारी एक जंगी फॅक्टरीच सुरू केली. उद्योग आणि व्यापार कमी असूनही त्यांचे व्यवस्थापन शिकलेले पदवीधर समाजात दिमाखात फिरू लागले. भले भले सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, आर्किटेक्ट्स आणि मेडिकल डॉक्टर्सही ‘एमबीए’ होऊ लागले. ‘एमबीए’ शिक्षित इंजिनीअर आणि तोही अमेरिकेतील पदवीधर असेल तर तो स्वत:ला ‘सुपरब्राह्मण’ समजू लागला. भांडवलदारांना भांडवलशाही आणि व्यापाऱ्यांना धंदा करण्याची कला शिकविणारे हे ‘सुपरब्राह्मण’ हवेतच चालू लागले. पण त्यांना जमिनीवर उतरविणारा, जगातील गरिबीचे, विषमतेचे, अन्यायाचे, उपेक्षेचे भान देणारा ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणजे शनिवारी निधन पावलेले सी. के. प्रल्हाद! कोईमतूर कृष्णराव प्रल्हाद म्हणजे सी. के. प्रल्हाद. प्रल्हाद यांच्या नावातील पहिले आद्याक्षर ‘सी’...

भाववाढीचे राजकीय अर्थशास्त्र

जीवनोपयोगी वस्तूंची आणि खास करून खाद्यान्नाची भाववाढ अर्निबध पद्धतीने सुरू राहाते, तेव्हा त्याची आंच समाजातील सर्वच घटकांना जाणवते. अगदी अंबानी बंधूंसारखे अब्जाधीशही या भाववाढीमुळे कामगारांच्या वेतनात वाढ होऊन परिणामी आपला नफ्याचा दर घटेल, या भीतीने थोडेफार सचिंत होत असतील. स्थिर उत्पन्न असणारी गोरगरीब प्रजेला किमान नजीकच्या काळात तरी वाढती उपासमार सहन करण्यावाचून दुसरा पर्याय उपलब्ध नसतो. अशी भाववाढ करण्यामागे कोणत्या शक्ती कार्यरत आहेत, याचे ज्ञान या महागाईच्या खाईत होरपळून निघणाऱ्या माणसाला नसते. अगदी विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी परीक्षा पास झालेल्या उच्चशिक्षित माणसालाही अभ्यासक्रमाद्वारे मिळणारे ज्ञान मर्यादित असते. तो वस्तूंचे भाव मागणी आणि पुरवठा यांच्या संतुलनाद्वारे निश्चित होतात, असे शिकलेला असतो. पण ते पूर्ण सत्य नव्हे. कारण बाजारपेठेतील पुरवठा कमी वा जास्त करून वस्तूंच्या ‘नैसर्गिक’ किमतीत फेरफार करण्याची कुवत वस्तूंचे उत्पादक वा वितरक यांच्यामध्ये असते. ज्या वस्तूंचे भाव वाढतात त्या वस्तूंचे उत्पादक वा वितरक यांचा भाववाढीमुळे आर्थिक लाभ होतो हे उघडच आहे. तसेच या ...

बजेटची गोष्ट

फेब्रुवारी महिन्यातील सर्वात महत्त्वाचा इव्हेंट म्हणजे बजेट अर्थात अर्थसंकल्प. अर्थसंकल्प हा सरकारचा वार्षिक उपक्रम असून गरीब, श्रीमंत सारेच त्याच्या प्रतीक्षेत असतात. अर्थसंकल्प किवा बजेट हा शब्द मध्ययुगीन काळातील इंग्लिशमधील बॉगेट (bowgette) या शब्दाचे सुधारित रूप आहे. हा शब्दही मध्यकाळातील फ्रेंच भाषेतील (bougette) या शब्दापासून आला आहे. या शब्दाचा मूळ अर्थ चामड्याची बॅग असा होतो. अलीकडच्या काळात अर्थसंकल्प फेब्रुवारीत सादर करण्यास सुरुवात झाली. मात्र, बजेटचा थोडा मागे जाऊन इतिहास रंजक आहे. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला तो २६ नोव्हेंबर १९४७ रोजी. तत्कालीन पहिले अर्थमंत्री सर आर.के. षण्मुगम चेट्टी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. १९४४ च्या 'बॉम्बे प्लॅन'च्या धर्तीवर हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलाहोता. जॉन मथाई, जी.डी.बिर्ला आणि जे.आर.डी. टाटा यांनी एकत्रितरीत्या तो तयार केला होता. या पहिल्याच अर्थसंकल्पात देशाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता आणि कोणत्याही प्रकारचे आर्थिक धोरण मांडण्यात आले नव्हते. १९५० - ५१ च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमं...