Posts

खरी चूक देवाचीच

रागावू नका मंडळी, कोणाच्याच भावना दुखवायची माझी इच्छा नाही; पण शांतपणे विचार करून पाहिलात, तर तुम्हीसुद्धा 'चूक देवाचीच आहे' हे लगेच कबूल कराल. देवाचा अवमान करण्याचा तर माझा काडीमात्र हेतू नाही. त्याच्याशी पंगा घेऊन, मेल्यानंतर मला नरकात जाऊन पडायचे आहे थोडेच? देव सर्वशक्तिमान आहे. साऱ्या विश्वाचा व्यवहार केवळ त्याच्या इच्छेनुरूप चालतो. आपण कोणाच्या पोटी, केव्हा आणि कुठे जन्म घ्यायचा, जन्मभर काय भोग वा हालअपेष्टा भोगायच्या, केव्हा मरायचे हे सारे देवच ठरवतो. जिवंतपणी आपल्या हातून कोणती कृत्ये व्हावीत, इतकेच काय, पण आपल्या मनात कोणते विचार यावेत, हेही सारे केवळ देवच ठरवतो. टाचणीच्या टोकावर ज्यांचा मेंदू ठेवला तरीदेखील त्या टोकावर मूळ जागेइतकीच जागा शिल्लक राहील, अशा किडय़ा-मुंगीसारख्या क्षुद्र (क्षुद्र केवळ आपल्या लेखी हं, परमेश्वराच्या लेखी नव्हे! कारण तीही त्याचीच निर्मिती आहे ना?) जीवांनासुद्धा आहार, निद्रा, भय, मथुन या गोष्टी परमेश्वराने त्यांच्या जीन्समध्ये आणि डीएनएमध्ये लिखित स्वरूपात दिल्या आहेत. आपण ती लिपी अजून तरी वाचू शकत नाही, ही बाब वेगळी! श्वसन, पचन, उत्सर्जन,...

समाजाला सुसंस्कृत करण्याचे समर्थ माध्यम आणि मोहंमद रफी साहेब

सिनेमा ज्याला लिहिता-वाचता येत नव्हतं अशा निरक्षरांना सुशिक्षित करण्याचं सिनेमा हे एकमेव तत्कालीन साधन ठरलं. अशा या सिनेमाचा जन्म सन १८९५ मध्ये पॅरिसमध्ये झाला. या नवनिर्मित कलाकृतीच्या किमयेनं माणसाची जीवनशैलीच प्रभावित केली. लोकांना या कलाकृतीचं अक्षरश: वेड लागलं. या वेडानं, महाराष्ट्रातील दादासाहेब फाळके नावाचं प्रभावशाली व्यक्तिमत्त्व इतकं झपाटल्या गेलं की, लगेच परदेशात जाऊन त्यांनी या कलेचे तांत्रिक, वैज्ञानिक आणि आर्थिक बारकावे शिकून घेतले आणि आपल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वानं सन १९१३ मध्ये ‘राजा हरिश्‍चंद्र’ हा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला चित्रपट तयार करून, भारतात चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. मात्र, हा मूक चित्रपट होता. पुढे ध्वनीचं तंत्रज्ञान विकसित होत गेलं आणि सन १९३१ मध्ये ‘आलमआरा’ हा पहिला बोलपट भारतात तयार झाला. सिनेमा हे जनमाध्यम आहे आणि ते समाजप्रबोधनाचेही माध्यम होऊ शकते, हे तत्कालीन जाणत्या मंडळीला कळून चुकले. अशिक्षितांना चित्रपटांनी करमणुकीसोबतच विविध विषयांचे ज्ञान दिले. स्वातंत्र्य, समता, बंधुता व मानवता या मूल्यांची जोपासना करण्यासाठी आ...

ओळख असू द्या : लेखक-शफाअत खान

ओळख नसणे हे सर्व मानवी दु:खांचं मूळ आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे. ओळख हवीच. ओळख नसलेला माणूस ताशी शंभर मैल वेगाने धावला तरी इंचभरही पुढे सरकत नाही. ओळख असलेला झोपून राहिला तरी तो उठायच्या आत शंभर मैल पुढे गेलेला असतो. आता मी ठरवून टाकलं आहे- मागे राहायचं नाही. ओळखी वाढवायच्या. लहान-थोर, भला-बुरा दिसेल त्याच्याशी सलगी करायची, सर्वाशी खेळीमेळीनं वागायचं. छोटय़ांना कडेवर घ्यायचं, मधल्यांवर प्रेम करायचं, ज्येष्ठांच्या पायावर पडायचं. ओळखी वाढवून पुढे जायचं. खूप मोठं व्हायचं. पूर्वी बालमनावर संस्कार करण्यासाठी गोष्टी सांगण्याची पद्धत होती. मी ऐकलेली एक गोष्ट मला सतत आठवते. गोष्टीत मोठय़ा प्रवासाला निघालेला एक नायक असतो. तो लगबगीनं चालत असताना अचानक मागून हाका ऐकू येतात. तो गडबडतो. थांबतो. मागे वळून बघतो. तो थांबून मागे वळतो- न वळतो तोच त्याचा दगड होत असे. आता रस्ते दिसत नाहीत. दगडच दिसतात. सर्व रस्ते खचाखच दगडांनी भरून गेले आहेत. थांबून, मागे वळून बघणारे पायाखाली दगड होऊन पडले आहेत. आता आपला दगड होऊ नये म्हणून आपण कुणाच्या हाकेला 'ओ' देत नाही. थांबत नाही. धावत राहतो. 'थांबला तो ...

हवेलीरामचा किमतराय By गिरीश कुबेर

Image
किमतराय गुप्ता हे गेल्या आठवडय़ात गेले. वय तसं काही फार होतं असं नाही. ७७ वर्षांचे होते ते. तब्येतीनं खरं तर ठणठणीत होते. पण हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि जागच्या जागीच गेले. मोठा माणूस. जवळपास २०० कोटी डॉलरची उलाढाल होती त्यांची. ..पण त्यांच्या मरणाची बातमीदेखील आली नाही कुठे. अनेकांना तर माहीतही नसेल कोण हे किमतराय म्हणून. आता व्यक्तीच माहीत नाही तर त्यांची किंमत कशी असणार आपल्याला. आता तर तोही प्रश्न येणार नाही. कारण ते गेलेच. निदान गेल्यानंतर तरी त्यांच्या कर्तृत्वाचा परिचय व्हावा म्हणून हा प्रपंच. आपण तेवढा तरी तो करून घेतला पाहिजे. कारण अगदी आंतरराष्ट्रीय वाटावा असा एक मोठा ब्रॅण्ड त्यांनी आपल्या देशाला दिला. किंबहुना आजही अनेकांना माहीतही नसेल आपण कौतुक करतोय ते उत्पादन आपल्या देशाचं आहे म्हणून. किमतराय हे काही जन्मजात उद्योगपती नव्हेत. जन्म गरिबीतला. पंजाबातल्या मालेरकोटला गावात. वडील शेतमजुरी करायचे. पोरांना शिकवायची वगरे बोंबच. गरिबाच्या घरी पोरांनी आपापल्या पायावर उभं राहायची गरज असते. शिक्षणापेक्षा जगण्याचं आव्हान केव्हाही मोठंच असतं. त्यामुळे गरिबाची मुलं शिकली नाही तरी ...

उपमा-डॉ. अंकुर रविकांत देशपांडे

Image
उपम्यावरील एक खुसखुशीत आणि अभ्यासपूर्ण लेख __________________________________________________________  पोहे आणि उपमा हे महाराष्ट्रात घरोघरी हमखास केले जाणारे आणि सहसा सगळ्यांना आवडणारे पदार्थ. त्यातल्या उपम्याचा महिमा- उपमा हा खरेतर सर्वकालीन महान खाद्य पदार्थ. पश्चिम महाराष्ट्राचे राष्ट्रीय खाद्य असलेल्या 'कांदेपोह्य़ां'नंतर सबंध महाराष्ट्राने ज्या खाद्यपदार्थावर मनापासून प्रेम केले असा हा पदार्थ. सध्या 'चेंज' म्हणून लाल ड्रॅगनसह अ‍ॅल्युमिनियमचे स्वच्छ घासलेले, पण झाकण लावायच्या खोबणीत कोणाची दृष्ट लागू नये इतपतच काळ्या रंगाची रेघ असलेले मोठ्ठे कुकर रस्तोरस्ती दिसून येतात. हरकत नाही.. लपंडाव खेळताना एखादा पोट्टा त्यात जाऊन लपला तर दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत सापडणार नाही याची खात्री.. महाराष्ट्रीय माणूस दिवसभर दाक्षिणात्य इडली- वडे-डोसे (पचायला हलके असते. यू नो अँड इट हॅज लेस कॅलरीज कम्पेअर्ड टू आऊटडेटेड शिरा अँड सांजा.. समोर असतो 'चीज डोसा'. असो) खातो. उत्तर भारतीयाने सामोसा असे न म्हणता 'समोसा' म्हणून समोर आणून ठेवलेला त्रिकोण. ज्या त्रिकोणातल...

महाराष्ट्र २०१९-सदानंद मोरे

समूहाची ऐतिहासिकता आणि भविष्यदृष्टी यांचा त्याच्या वर्तमान कृतीवर प्रभाव पडत असतो. काही कृती करण्याऐवजी समूह स्मरणरंजनात व स्वप्नरंजनात दंगून जाण्याचा धोकाही संभवतो. असा समाज निष्क्रिय बनतो किंवा चुकीच्या कृती करतो. आपली अवनती होण्यामागची खरी कारणे शोधण्यासाठी आत्मपरीक्षण करण्याऐवजी तो त्याचे खापर इतरांच्या डोक्यावर फोडण्यातच समाधान मानतो. इ. स. २०२० पर्यंत भारताने महासत्ता होण्याचे स्वप्न काही धुरीणांनी पाहिले व दाखवलेदेखील आहे; पण तूर्त आपली चर्चा महाराष्ट्रापुरती मर्यादित असल्याने त्याचा विचार नको. असेच स्वप्न चीनसारखे इतर राष्ट्रसमाजही पाहात आहेत. याचा उल्लेख केला म्हणजे पुरे. या अनुरोधाने महाराष्ट्राची म्हणजे मराठी समाजाची चर्चा करायला हरकत नसावी. मराठय़ांची म्हणजेच मराठी समाजाची प्रकृती काय आहे याची सर्वात चांगली चिकित्सा राजारामशास्त्री भागवत यांनी केली. दुर्दैवाने महाराष्ट्र राजारामशास्त्रींना पूर्णपणे विसरला. राजारामशास्त्री लिहीत होते तो काळ ब्रिटिश पारतंत्र्याचा होता. म्हणजे तेव्हा संपूर्ण भारत देशच गुलामगिरीत खितपत पडला होता. अशा वेळी भागवतांनी मराठी आयडेंटिटीचा विचार केल...

रुजुवात : चवीने खाणार त्याला..मुकुंद संगोराम

लहानपणी जेवताना घास घशाखाली उतरेनासा झाला की आई म्हणायची, ‘ताट स्वच्छ करायचं, नाही तर डोक्याला बांधीन’. त्या भीतीनं ताट कसंबसं स्वच्छ व्हायचं, पण डोक्यात विचारचक्र सुरू व्हायचं, की ताटातलं उरलेलं अन्न आई डोक्याला कसं काय बांधणार? तेव्हापासून आत्तापर्यंत त्या भीतीनं ताट संपवण्याचं नैतिक बंधन आपोआप पाळलं गेलं. पण आता असं आठवतं, की ते अन्न खूपच चविष्ट असे. त्यात शेपूची भाजी कधी तरी असायचीच. शेपूची चव आवडेनाशी असली, तरी ती भाजी खाणं भाग असे. नंतर ती चव आवडायला लागली. तव्यावरची गरम पोळी मिळण्याचे दिवस संपले तरी ती चव मात्र अजूनही रेंगाळणारी ठरली. पिठलं भाकरी हे अगदी पंधरा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत पक्वान्न म्हणून ओळखलं जात नव्हतं. दिवाळीचा फराळ दिवाळीतच तयार व्हायचा आणि श्रीखंड, बासुंदी ही पक्वान्नं फार क्वचित जिभेवर यायची. आता शेव चिवडा हे दैनंदिन खाद्य झालं आहे आणि जिलबी, आम्रखंड हे कधीही, केव्हाही सहज उपलब्ध असतं. भात, भाजी, पोळी किंवा भाकरी, चटणी, कोशिंबीर, लोणचं, ताक किंवा दही असा साधारण रोजचा स्वयंपाक असलेल्या घरात आता जेवणातच रेडिमेड अन्न समाविष्ट झालं आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांत आपल...