Posts

उपमा-डॉ. अंकुर रविकांत देशपांडे

Image
उपम्यावरील एक खुसखुशीत आणि अभ्यासपूर्ण लेख __________________________________________________________  पोहे आणि उपमा हे महाराष्ट्रात घरोघरी हमखास केले जाणारे आणि सहसा सगळ्यांना आवडणारे पदार्थ. त्यातल्या उपम्याचा महिमा- उपमा हा खरेतर सर्वकालीन महान खाद्य पदार्थ. पश्चिम महाराष्ट्राचे राष्ट्रीय खाद्य असलेल्या 'कांदेपोह्य़ां'नंतर सबंध महाराष्ट्राने ज्या खाद्यपदार्थावर मनापासून प्रेम केले असा हा पदार्थ. सध्या 'चेंज' म्हणून लाल ड्रॅगनसह अ‍ॅल्युमिनियमचे स्वच्छ घासलेले, पण झाकण लावायच्या खोबणीत कोणाची दृष्ट लागू नये इतपतच काळ्या रंगाची रेघ असलेले मोठ्ठे कुकर रस्तोरस्ती दिसून येतात. हरकत नाही.. लपंडाव खेळताना एखादा पोट्टा त्यात जाऊन लपला तर दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत सापडणार नाही याची खात्री.. महाराष्ट्रीय माणूस दिवसभर दाक्षिणात्य इडली- वडे-डोसे (पचायला हलके असते. यू नो अँड इट हॅज लेस कॅलरीज कम्पेअर्ड टू आऊटडेटेड शिरा अँड सांजा.. समोर असतो 'चीज डोसा'. असो) खातो. उत्तर भारतीयाने सामोसा असे न म्हणता 'समोसा' म्हणून समोर आणून ठेवलेला त्रिकोण. ज्या त्रिकोणातल...

महाराष्ट्र २०१९-सदानंद मोरे

समूहाची ऐतिहासिकता आणि भविष्यदृष्टी यांचा त्याच्या वर्तमान कृतीवर प्रभाव पडत असतो. काही कृती करण्याऐवजी समूह स्मरणरंजनात व स्वप्नरंजनात दंगून जाण्याचा धोकाही संभवतो. असा समाज निष्क्रिय बनतो किंवा चुकीच्या कृती करतो. आपली अवनती होण्यामागची खरी कारणे शोधण्यासाठी आत्मपरीक्षण करण्याऐवजी तो त्याचे खापर इतरांच्या डोक्यावर फोडण्यातच समाधान मानतो. इ. स. २०२० पर्यंत भारताने महासत्ता होण्याचे स्वप्न काही धुरीणांनी पाहिले व दाखवलेदेखील आहे; पण तूर्त आपली चर्चा महाराष्ट्रापुरती मर्यादित असल्याने त्याचा विचार नको. असेच स्वप्न चीनसारखे इतर राष्ट्रसमाजही पाहात आहेत. याचा उल्लेख केला म्हणजे पुरे. या अनुरोधाने महाराष्ट्राची म्हणजे मराठी समाजाची चर्चा करायला हरकत नसावी. मराठय़ांची म्हणजेच मराठी समाजाची प्रकृती काय आहे याची सर्वात चांगली चिकित्सा राजारामशास्त्री भागवत यांनी केली. दुर्दैवाने महाराष्ट्र राजारामशास्त्रींना पूर्णपणे विसरला. राजारामशास्त्री लिहीत होते तो काळ ब्रिटिश पारतंत्र्याचा होता. म्हणजे तेव्हा संपूर्ण भारत देशच गुलामगिरीत खितपत पडला होता. अशा वेळी भागवतांनी मराठी आयडेंटिटीचा विचार केल...

रुजुवात : चवीने खाणार त्याला..मुकुंद संगोराम

लहानपणी जेवताना घास घशाखाली उतरेनासा झाला की आई म्हणायची, ‘ताट स्वच्छ करायचं, नाही तर डोक्याला बांधीन’. त्या भीतीनं ताट कसंबसं स्वच्छ व्हायचं, पण डोक्यात विचारचक्र सुरू व्हायचं, की ताटातलं उरलेलं अन्न आई डोक्याला कसं काय बांधणार? तेव्हापासून आत्तापर्यंत त्या भीतीनं ताट संपवण्याचं नैतिक बंधन आपोआप पाळलं गेलं. पण आता असं आठवतं, की ते अन्न खूपच चविष्ट असे. त्यात शेपूची भाजी कधी तरी असायचीच. शेपूची चव आवडेनाशी असली, तरी ती भाजी खाणं भाग असे. नंतर ती चव आवडायला लागली. तव्यावरची गरम पोळी मिळण्याचे दिवस संपले तरी ती चव मात्र अजूनही रेंगाळणारी ठरली. पिठलं भाकरी हे अगदी पंधरा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत पक्वान्न म्हणून ओळखलं जात नव्हतं. दिवाळीचा फराळ दिवाळीतच तयार व्हायचा आणि श्रीखंड, बासुंदी ही पक्वान्नं फार क्वचित जिभेवर यायची. आता शेव चिवडा हे दैनंदिन खाद्य झालं आहे आणि जिलबी, आम्रखंड हे कधीही, केव्हाही सहज उपलब्ध असतं. भात, भाजी, पोळी किंवा भाकरी, चटणी, कोशिंबीर, लोणचं, ताक किंवा दही असा साधारण रोजचा स्वयंपाक असलेल्या घरात आता जेवणातच रेडिमेड अन्न समाविष्ट झालं आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांत आपल...

निळासावळा नाद | पांडुरंग कांती:विवेक दिगंबर वैद्य

Image
भागवत धर्म-वारकरी  म्हणजे नेमके काय -पंढरपुरात नेमके असे काय आहे की जिथे लाखो भक्त अतीव श्रद्धेने आषाढी/कार्तिकी सोबतच आपल्या आयुष्यात वेळ मिळेल तेव्हा जात असतात असे अनेक प्रश्न मला पडत होते त्यांचे उत्तर अजूनहि शोधतो आहेच पण त्यांचे उत्तर बहुधा मिळू शकेल असे हा निळासावळा नाद पांडुरंग कांती(लेखक विवेक दिगंबर वैद्य )वाचण्याचा योग आला.  काय अलौकिक लेख आहे हो हाअगदी शब्दातीतच!प्रत्यक्ष ही अलौकिक वाचनानुभूती घ्या एकदा. बहुतेक त्या पांडुरंगाचा वरदहस्त असावा विवेक वैद्य साहेबांना असो!  ____________________________________________________________________________________________________ आषाढ शुक्ल दशमी दूरवर कसलेसे टोले पडले आणि राऊळाची कवाडं धाडदिशी बंद झाली. बाहेर अव्याहतपणे सुरू असलेला गलका एकाएकी सुन्न करणाऱ्या शांततेत जसा मिसळून गेला तसा तो भानावर आला. एव्हाना िदडीदरवाजाही बंद झाला होता. एकाएकी आलेल्या त्या नीरव शांततेमुळे तो क्षणभर सैलावला. दिवसभर त्याला ना विश्रांती मिळाली होती ना फुरसत. उभं राहून राहून त्याचे पाय जडावले होते. अर्थात, हे त्याच्यासाठी तसं नेहमीचंच ...

कथा एका शहराच्या यशस्वी पुनर्निर्माणाची- अनिरुद्ध पावसकर

ज गामधील सुनियोजित शहरांचा विचार केला तर असे लक्षात येते, की या सर्व शहरांमधील उत्कृष्ट नियोजन हे भागीदारीमुळे शक्‍य झालेले आहे. भागीदारी ही राज्यकर्त्यांची व नगर नियोजनामधील तज्ज्ञ व्यक्तींची. त्यासाठी दोघांनाही एकाच ध्येयाने झपाटलेले असणे अत्यावश्‍यक आहे. एक- उत्कृष्ट शहराची निर्मिती करणे, अशा कितीतरी भागीदाऱ्या सांगता येतील. ग्रेटर लंडनसाठी चर्चिल आणि पॅट्रिक ऍबरक्रॉम्बी, इस्लामाबादसाठी जनरल आयुब खान आणि डॉक्‍सियिडिस, नवी दिल्लीसाठी पंडित नेहरू आणि ल्युबरक्रॉम्बी, चंडीगडसाठी पंडित नेहरू व ली कारबुझियर या सर्व नगरनियोजनकारांची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती, इ. चे कौतुक करावे तितके थोडे. परंतु या राज्यकर्त्यांना तर सलामच केला पाहिजे. त्यांची दृष्टी, त्यांचे नेतृत्व व मुख्य म्हणजे नियोजनकारांना त्यांनी नियोजन करण्यासाठी दिलेले संपूर्ण स्वातंत्र्य. अशीच एक अत्यंत यशस्वी आणि हेवा वाटावा अशी भागीदारी साऱ्या जगाने एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला बघितली. पॅरिस शहराची पुनर्निर्मिती करताना लुईस नेपोलियन बोनापार्ट व जॉर्ज हाऊसमन यांच्या भागीदारीने साध्य केलेल्या जादूने संपूर्ण जगाला भ...

आई नावाचे विद्यापीठ

आई नावाचे विद्यापीठ  श्री गणेश चतुर्थी -२९/०८/२०१४ ,शुक्रवार बहुधा कोणी तरी अत्यंत समर्पक रित्या म्हटलेले आहे कि व्यक्तीची खरी किंमत ती गेल्यावरच कळते.  दर वर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग उत्साहात सांग्र -संगीत सुरु होती.सकाळी गणेश स्थापना ,पूजा विधी यथा सांग पार पाडून झाल्यावर संध्याकाळी ८. १५ वाजता घरून फोन आला आणि ........  आणि फोनवरचा निरोप ऐकून आभाळ कोसळणे काय असू शकते याचा अंदाज देणारी अत्यंत वेदनादायक बातमी कळाली ती आई गेल्याची.  क्षणभर आपल्याला कोणीतरी चुकून फोन केला किंवा आपल्या ऐकण्यात काही तरी गल्लत झाली असे वाटले पण त्यानंतर फोन येत राहिले आणि आणि................ काय पुढचे फार काही आठवत नाही पण १५ मिनिटाच्या आत पुण्याहून गावी/ घरी जाण्याची तयारी करून निघालोसुद्धा घराबाहेर सहकुटुंब. मिळेल त्या वाहनाने कसा-बसा पोहोचलो गावातल्या घरी.तेव्हा मात्र आतापर्यंत दाबून धरलेल्या भावना अनावर होऊन मुक्तपणे रडलो ,आजूबाजूलाही सर्व जण त्याच मनस्थितीत असल्याने काही बोलवेना पण कुणाशी. आम्ही पाचपैकी चार भावंडे आणि आमचे वडील-अण्णा यांच्या बरोबरच ...

पराभव की प्रगल्भता ? (लेखक- डॉ. संजय ओक)

When faced with senseless drama, spiteful criticisms and misguided opinions, walking away is the best way to stand up for yourself.  To respond with anger is an endorsement of their attitude.  - Dodinsky Change your thoughts today. डॉडिन्स्कीच्या या वचनाने आज माझ्या मनाचा ठाव घेतला.  कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी कार्यालयीन प्रगती होते, तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच. सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा,  तसा. हा निसर्गाचाच नियम आहे. कधी कधी आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते. पण संत एकनाथ म्हणालेच होते की, थुंकणारा सिद्धेश्वर बाबाही आलाच. विरोधाला कार्यकारणभाव नसतो. तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भणभणू लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात. खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात. मग तुमच्यावर आरोप होतात- गरव्यवस्थापनाचे, गरकारभाराचे, भ्रष्टाचाराचे! तुम्ही भांबावता.. हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता. शब्दाला श...