मीठी मीठी बातें...
सध्या साखरेचे नाव जरी तोंडावर आले तरी ती कडू लागते. याचे कारण साखर एवढी महाग झाली आहे की, ती कडूच लागावी. मात्र साखर उद्योगात एक गोड बातमी आली आहे आणि ती मराठी माणसाशी निगडित आहे. बेळगावच्या श्री रेणुका शुगर्स लि. या तरुण उद्योजक नरेंद्र मुरकुम्बी यांच्या कंपनीने ब्राझीलमधील इक्वीपॉव ही कंपनी तब्बल १५३० कोटी रुपयांना विकत घेतली आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांनी ब्राझीलची अशीच एक कंपनी विकत घेतली होती. आत्ताच्या या टेकओव्हरमुळे श्री रेणुका शुगर्स ही जगातली तिसरी आघाडीची साखर उत्पादक कंपनी ठरली आहे. ब्राझीलच्या दोन कंपन्या ताब्यात आल्यावर नरेंद्र मुरकुम्बी व त्यांच्या मातोश्री विद्या यांनी खऱ्या अर्थाने ‘साखर सम्राट’ होण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांनी घेतलेल्या कंपनीमुळे रेणुकाचा समावेश जगातल्या पहिल्या दहा साखर उत्पादक कंपन्यांत झाला होता. सध्याच्या या घडामोडींमुळे देशातीलच नव्हे तर जगातील साखर उद्योगाच्या अग्रभागी आलेली ही मायलेकाची जोडी दहा वर्षांपूर्वी कुणाला विशेष माहीतही नव्हती. मुरकुम्बी कुटुंबीय हे काही साखरेच्या पिढीजात उद्योगात नाहीत. या उद्योगात त्यांची...